Your Own Digital Platform

'ऑपरेशन मेघदूत'चे नायक ले. जनरल पी. एन. हून यांचे निधन


स्थैर्य, चंदीगड: पाकिस्तानविरुद्ध १९८४च्या युद्धात महत्त्वाची भूमिका निभावणारे व 'ऑपरेशन मेघदूत'चे नायक म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हुन (पी. एन. हून) यांचे पंचकुला येथील रुग्णायलात सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. पश्चिम कमांडचे प्रमुख असताना १९८७ मध्ये लेफ्टनंट जनरल हून लष्करातून निवृत्त झाले होते. दरम्यान, २०१३ मध्ये जनरल हून यांनी राजकारणात उतरत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

प्रकृती ढासळल्याने हून यांना पंचकुलातील चांदीमंदीर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच सायंकाळी ५.३० वाजता त्यांचे निधन झाले.

'ऑपरेशन मेघदूत' ही हून यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी मोहीम होती. ही मोहीम फत्ते करतानाच हून यांनी आणखीही अनेक धाडसी मोहिमांत तसेच युद्धांत धुरा सांभाळत शौर्य गाजवले.