Your Own Digital Platform

सातारा- जावली मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प लागणार मार्गी


ना. अजित पवारांचा हिरवा कंदील; कास धरण, छ. शिवाजी वास्तू संग‘हालयाला निधी मंजूर

स्थैर्य, सातारा : सातारकरांसाठी वरदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम निधी नसल्याने रखडलेले आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण व्हावा. तसेच तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रकि‘या सुरु करावी. छ. शिवाजी महाराज वास्तू संग‘हालयाच्या इमारतीचे काम पुर्ण करुन संग‘हालय तातडीने जनतेसाठी खुले करावे. कि‘े सज्जनगडावर परळी येथून रोप वे करवा यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठीकीत जोरदार आवाज उठवला. ना. अजित पवार यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सर्व मागण्या मान्य करुन तातडीने कास धरणासाठी १८ कोटी निधी मंजूर केला. तसेच छ. शिवाजी महाराज वास्तू संग‘हालय व इतर कामांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीचा आढावा ना. अजित पवार यांनी नुकताच घेतला. सातारा जिल्ह्यासाठी झालेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामासाठी आवश्यक असणारा उर्वरीत निधी तातडीने मंजूर करण्याची आग‘ही मागणी केली. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास धरणाची उंची वाढवणे या भांडवली कामास उर्वरीत अनुदान वितरीत करणे व निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली. सदर कामासाठी आवश्यक असणारे उर्वरित अनुदान १८ कोटी रुपये तातडीने नगरपरिषदेस मिळावे. तसेच सुधारीत प्रकल्प अहवालानुसार वाढीव रक्कम ४२ कोटी रुपयांच्या तरतूदीसाठी पुरवणी मागणी मंजूर करुन निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. या कामासाठीचा तातडीचा १८ कोटी रुपये निधी त्वरीत मंजूर करुन ना. पवार यांनी पुरवणी मागणीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सुचना उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

महाबळेश्‍वर, किल्ले  अजिंक्यतारा, कास पठार, ठोसेघर, भांबवली धबधबा, बामणोली, सज्जनगड आदी पर्यटनस्थळांमुळे वर्षभर महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देश आणि परदेशातूनही सातार्‍यात पर्यटकांची ये-जा सुरु असते. किल्ले  सज्जनगड याठिकाणी दासनवमी, रामनवमी, गुरुपौर्णिमा यासह वर्षभर धार्मिक कार्यक‘म व दासबोध शिबीरांचे आयोजन होत असते. त्यामुळे वयोवृध्द भावीक पर्यटकांची सं‘या जास्त असते. सज्जनगडावर येणार्‍या पर्यटकांची सोय व्हावी यासाठी परळी ते सज्जनगड रोप वे सुरु करणे आवश्यक आहे. सदरच्या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली असून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास तातडीने मंजूरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच सातारा येथे छ. शिवाजी महाराज वास्तू संग‘हालयाच्या इमारतीचे काम पुर्णत्वास गेलेले आहे. इमारतीतील ङ्गर्निचर, रंगकाम व इतर तत्सम कामे शि‘क असून ही कामे निधी अभावी रखडलेली आहेत. एक सुसज्ज वास्तू संग‘हालय जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी तातडीने उर्वरीत कामांसाठीचा निधी मंजूर करावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली. या दोन्हीसाठी तातडीने निधीची तरतूद करण्याच्या सुचना ना. पवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत जागेअभावी रखडलेली आहे. जागेचा प्रश्‍न सुटेल तेव्हा सुटेल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात मेडीकल कॉलेज सुरु करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात मेडीकल कॉलेज सुरु करण्यासाठी पदनिश्‍चिती आणि पदनिर्मीती करण्यात आली. दरम्यान, प्रत्यक्षात मेडीकल कॉलेज सुरु करण्यासाठी आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रकि‘या सुरु करावी, अशी आग‘ही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून सातार्‍यात मेडीकलच्या प्रथम वर्षाचे शिक्षण सुरु करण्यासाठी ना. पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. याशिवाय सातारा येथील देगाव टप्पा क‘. ३ एम.आय.डी.सी. च्या भुसंपादनाची प्रक‘ीया प्रलंबीत आहे. सदर एम.आय.डी.सी. उभी राहिल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक‘ीया लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्री आणि औद्योगिक व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यासाठीही ना. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

दरम्यान, बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांचे लेखी निवेदनही ना. पवार यांना दिले असून बैठकीत या सर्वच प्रश्‍नांवर ना. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या सर्व मागण्या मान्य करुन निधी उपलब्ध करुन दिला. बैठकीत जिल्ह्यासाठी ३२५ कोटींच्या नियोजन आराखड्याला मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार आहेत.