Your Own Digital Platform

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात ही ‘सायबर सेफ वुमन’ जनजागृती
स्थैर्य, सातारा : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री. कदम म्हणाले, महिला व विद्यार्थींनींनी आपली वैयक्तिक माहिती अथवा फोटो कधीही सोशल मिडीयावर शेअर करु नये, विद्यार्थींनींनी विद्यार्थी जीवनात मोबाईल गरजेचा आहे का हे तपासून पहावे, ॲण्ड्राईड मोबाईल फोन वापरताना दैनंदिन जीवनात इंटरनेटशी येणारा संबध व त्यातून कळत नकळत घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांची उदाहरणे देऊन यापासून कसा बचाव करता यईल याबाबत माहिती दिली. तसेच सायबर सेफ वुमन ही एक सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मोहिम असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, कोणालाही काही अडचण आल्यास किंवा तक्रार नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्याwww.reportphishing.inhttps://cybercrime.gov.in तसेच महिला आणि बालकांसाठी सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी करीता 155260 या टोल फ्री कमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील सिनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एल.एन.घाटगे म्हणाले, सायबर सेफ वुमन या उपक्रमातून आमच्या महाविद्यालयातील विर्द्थ्यांनीना खूप चांगली माहिती मिळाली, याबाबत त्यांनी शासनाचे आभार मानले.

यावेळी ‘सायबर सेफ वुमन’ या मोहिमेद्वारे शासन करीत असलेल्या जनजागृतीचा आम्हाला निश्चीतच फायदा होईल, असे उपस्थित विद्यार्थींनीनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.आसावरी शिंदे यांनी तर आभार प्रा. डॉ. सुवर्णा कुरकुटे यांनी आभार मानले. यावेळी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण बावळेकर, सिनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एल.एन.घाटगे, प्राचार्या डॉ. पी.एस.गायकवाड, प्रा.डॉ. सुवर्णा कुरकुटे, प्रा. आसावरी शिंदे व महाविद्यालयातील विद्यार्थींनी उपस्थित होत्या.