Your Own Digital Platform

मांढरदेव येथील काळुबाई यात्रेस उत्साहपूर्ण सुरुवात


स्थैर्य, सातारा : ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषात मांढरदेव येथील काळूबाई यात्रेस उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. शाकंभरी पोर्णिमेला शुक्रवारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेंद्र दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते काळेश्‍वरी देवीची विधिवत महापुजा करण्यात आली.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश आर. शेट्टी, विश्‍वस्त तथा प्रांताधिकारी श्रीमती संगीता चौगुले-राजापुरकर, प्रशासकीय विश्‍वस्त तथा तहसीलदार रणजीत भोसले व त्यांच्या पत्नी पोलीस निरीक्षक सौ. देवीश्री मोहिते-भोसले, वाईचे न्यायाधिश व्ही. एन. गिरवलकर, न्या. डी. आर. माळी, विश्‍वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, सीए. अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे उपस्थित होते.

रांगेतील पहिले दांम्पत्य लक्ष्मण रामचंद्र पोतदार व सौ. हर्षदा पोतदार (भांडूप-मुंबई) यांचा मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते साडी-चोळी देऊन यायवेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, सार्वजनीक बांधकाम उपअभियंता श्रीपाद यादव, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे, शाखा अभियंता अजयसिंग यादव, उपशाखा अभियंता सचीन मोरे, योगेश कराडे, राजेंद्र रासकर, सरपंच सौ. अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे उपस्थित होते.