Your Own Digital Platform

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे अवाहन


स्थैर्य, सातारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने दरवर्षी दिला जाणाऱया शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी दि. 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 दरम्यान सन 2018-19वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा आधिकारी युवराज नाईक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी दि. 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.स्ल्स्ंaग्dग्न्sज्दे.म्दस् या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या त्ग्हक् वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि.5 फेब्रुवारी, 2020 रोजी पर्यंत सादर करावे. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणा-या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि.5 फेब्रुवारी, 2020 रोजी पर्यंत सादर करावे. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली इत्यादी माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय दि. 24 जानेवारी, 2020 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) Je ww.mumbaidivsports.com या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे.जीवन गौरव पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच पुरस्कारासाठी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा आधिकारी युवराज नाईक यांच्यावतीने करण्यात येत आहे.