Your Own Digital Platform

कोयना दुध उत्पादक संघ व चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने दुध उत्पादकता वाढ व आहार शास्त्र व्यवस्थापन यावर कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अतुलभाई शहा शेजारी उदयसिंह पाटील, संजय शिंदे, वसंतराव जगदाळे, बाबुराव धोकटे, अमोल गायकवाड, डॉ. सुरेश गंगावणे, डॉ. विजय नष्टे, रविंद्र थोरात

स्थैर्य, सातारा :  शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासाठी शेतीमाला बरोबरच दुध उत्पादकता हा मोलाचा भाग आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणारी दुभत्या जनावरांच्या संख्येमुळे येत्या काही वर्षातच दुधाची कमतरता जाणवणार आहे. यासाठी आत्तापासूनच शेतकर्‍यांनी दुभत्या जनावरांची संख्या वाढवणे व दुध उत्पादकता वाढ यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे उद्गार चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्सचे संचालक अतुलभाई शहा यांनी काढले. 

कोयना दुध उत्पादक संघ व चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे दुध उत्पादकता वाढ व आहार शास्त्र व्यवस्थापन या विषयांवर आयोजित कार्यशाळेत अतुलभाई शहा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, प्रगतशील शेतकरी संजय शिंदे, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, कोयना दूध संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, कार्यकारी संचालक डॉ. सुरेश गंगावणे, कोयना दुध संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. विजय नष्टे, चंदुकाका सराफ मार्केटिंग विभागाचे रविंद्र थोरात व अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी अतुलभाई शहा यांनी दूध उत्पादकता, सेंद्रीय व शाश्वत शेती भविष्यात कशी उपयोगाची आहे या विषयांवर सखोल मार्गदर्शन शेतकर्‍यांना केले.
 
यावेळी उदयसिंह पाटील व प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरेश गंगावणे यांनी दुध उत्पादकतेबरोबरच आहार शास्त्र व्यवस्थापन कसे महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.
 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सयाजीराव मोहिते यांनी तर आभार प्रदर्शन कोयना दुध संघाचे उपाध्यक्ष बाबुराव धोकटे यांनी केले. यावेळी शेतकरी, दुध उत्पादक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.