Your Own Digital Platform

भादे येथे हत्याराने युवकाचा खून


स्थैर्य, खंडाळा : खंडाळा तालुक्यातील भादे गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात अज्ञातांनी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अज्ञात युवकाचा तीक्ष्ण हत्याराने व दगडाने डोक्यात व मानेवर सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भादे ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची संबंधितांनी तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला याबाबतची दुरध्वनीदवारे कल्पना दिली.
 
यावेळी घटनेची माहिती समजताच तत्काळ घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाँ.सागर वाघ व एलसीबी पथक, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई , सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास भोईटे, रमेश वळवी, पोलीस हवालदार संजय पंडित, सी.एन.शेडगे, आप्पा कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड, संतोष ननावरे,सुरेश मोरे, सचिन वीर, नितीन महांगरे यांनी धाव घेतली असता त्याठिकाणी नीरा नदीच्या पाञात एक अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या युवकाचा मृतदेह तरंगताना दिसला.
 
यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता मृत युवकाच्या डोक्यामध्ये अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन व दगडाने  खून  करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यावेळी घटनास्थळी पोलीसांनी पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताचे थारोळेही आढळून आले.
 
यावेळी घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते.