Your Own Digital Platform

जांभेकरांच्या मुंबईतील स्मारकासाठी पत्रकार कल्याण निधीच्या पाठीशी उभे रहावे: लिमयेस्थैर्य, फलटण : बाळशास्त्रींनीं आपल्या पत्रकारितेतून निर्भिडतेचा संदेश दिला. ती निर्भीडता पत्रकारांनी अंगिकारावी. बाळशास्त्रीचे स्मरण कार्य करणार्‍या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य समजून घेऊन जांभेकरांच्या मुंबईमधील स्मारकाच्या मागणीसाठी सर्व पत्रकारांनी या संस्थेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन जेष्ठ पत्रकार व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले.
 
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ङ्गदर्पणङ्ख पुरस्कारांचे वितरण लिमये यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ङ्गदर्पणङ्खसभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते.
 
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, देवगड पंचायत समितीचे सभापती सुनील पारकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे सरपंच सादीक डोंगरकर, जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर काकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
लिमये म्हणाले, बाळशास्त्रींच्या जन्मभूमीत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने पहिले समरक उभारून त्याची उपेक्षा दूर करण्याचे काम केले आहे. आता त्याच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबई मध्ये स्मारकाची मागणी योग्य आहे. त्यासाठी संस्थेने विभागावर पत्रकारांचे संघटन करून यासाठी प्रयत्न करावेत. पत्रकारांनी या मागणीसाठी आंदोलनाचीही तयारी ठेवावी असेही लिमये यांनी स्पष्ट केले.
 
प्रकाश देशपांडे म्हणाले, सर्कलज ओळ बुद्धीचे वैभव आहे. महाराष्ट्रातील सात पैकीच्या सहा भारतरत्न कोकणातील आहेत. कोकणातील या महापुरुषाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठीशी असल्याचे सांगून मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यलयात लावण्यासाठी बालशास्त्रीचें तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या वतीने दिले जाईल असेही देशपांडे यांनी घोषित केले.
 
अध्यक्षीय भाषणात रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले के महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्री यांच्या पुण्याइने अनेक अडथळे पार करत महाराष्ट्रातील त्यांचे पहिले स्मारक उभारले हे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत असल्याने या स्मारकाला व येथे वितरित होणार्‍या दर्पण पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे बाळशास्त्रींची कर्मभूमी मुंबई होती त्याठिकाणी मात्र अद्याप बाळशास्त्रींचे स्मारक नाही ही खंत व्यक्त करून राज्यातील सर्व पत्रकारांनी यासाठी सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे असल्याचेही बेडकीहाळ यांनी सांगितले.
 
प्रारंभी दिपप्रज्वलन व बाळशास्त्री यांच्या अर्धपुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर सन 2018 च्या प्रतिष्ठेच्या 26 व्या दर्पण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यामध्ये ङ्गआचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कारङ्ख - शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), ङ्गदर्पणङ्ख पुरस्कार कोकण विभाग - राजेश परशुराम जोष्टे (प्रतिनिधी, दै.पुढारी, चिपळूण), उत्तर महाराष्ट्र विभाग - महेंद्र शामकांत देशपांडे (संपादक, सा.नाशिक वृत्तवैभव, नाशिक), पश्चिम महाराष्ट्र विभाग - प्रकाश नामदेव कांबळे (प्रतिनिधी, दै.सामना, सांगली), मराठवाडा विभाग - उमेश श्रीकृष्ण काळे (वृत्तसंपादक, दै.पुढारी, औरंगाबाद), विवेक केरुरकर (संपादक सा.सार्वभौम जनता, देगलूर), विदर्भ विभाग - अनिल केशवराव पळसकर (संपादक, सायं.दै.विदर्भ दर्पण, चिखली), बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत ङ्गपत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक दर्पण पुरस्कारङ्ख डॉ.हंसराज वैद्य (ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील, कराड पुरस्कृत धाडसी ङ्गदर्पणङ्ख पुरस्कार शर्मिष्ठा भोसले (मुक्त पत्रकार, मुंबई), विशेष दर्पण पुरस्कार नासिर इसाकभाई शिकलगार (प्रतिनिधी, दैनिक लोकमत, फलटण), राजेंद्र उर्फ राजू दत्तात्रय वाघमारे (मुक्त पत्रकार, पुणे) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले सूत्रसंचालन ताराचंद्र आवळे यांनी केले. आभार अमर शेंडे यांनी मानले. 

कार्यक्रमास पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आधी जिल्ह्यातील पत्रकार पोंभूर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
पोंभुर्लेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य ना.डॉ.नीलम गोर्‍हे
यंदाच्या दर्पण पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ना. डॉ. नीलम गोर्‍हे या विधानभवन येथील बैठकीमुळे समारंभास येऊ शकल्या नाहीत. त्यांनी ऑडिओ संदेशादवरे समारंभास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी करीत असलेले पत्रकारांचा सन्मान व बाळशास्त्रींचे स्मरण कार्य ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे बाळशास्त्रींनी आपले आयुष्य पत्रकारितेला समर्पित केले होते त्यांच्याप्रमाणे आज अनेक पत्रकार जयाने प्रेरित होऊन समाजातील वस्तुनिष्ठता मांडण्याचा प्रयत्न करत आहेत माध्यमांच्या शक्तिचा विकासात्मक उपयोग महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ने पोंभुर्ले मध्ये केला आहे दर्पण करांच्या या जन्मभूमीच्या विकासासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना डॉ नीलम गोर्‍हे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑडिओ संदेशाद्वारे सांगितले.