Your Own Digital Platform

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सातारा मधून चांगला प्रतिसाद

पोवई नाका परिसरातील मरिआई महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील सर्व दुकाने बंद मध्ये सहभागी होती.

स्थैर्य, सातारा : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर एन आर सी व सी ए ए दोन कायदे करून देशामध्ये फूट पाडून संविधान संपवण्याचे कटकारस्थान करणाऱ्या सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडी चे. नेते एड. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या आदेशानुसार आज (24 जानेवारी 2020) कराड येथील वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सातारा बंदचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला व्यापारी उद्योग संघटना व नागरिक यांनी चांगला प्रतिसाद देऊन बंदमध्ये सहभाग नोंदवला.
सातारा शहरातून मुख्य बाजारपेठेतून टू व्हीलर फेरी काढून लोकांना आवाहन करण्यात आले की भारत सरकारने नागरिकत्व कायदा लागू केलेला आहे या कायद्यामुळे सर्वसामान्य बहुजन समाजातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागणार असून देशांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण केले जात आहे या विरोधात वंचित बहुजन आघाडी ने बंद पुकारला असून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहरातील व्यापारी उद्योजक नागरिक यांनी चांगला प्रतिसाद देऊन हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.

महाराष्ट्र बंद मध्ये सातारा शहरातील पोवई नाका परिसारात सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीसांची जादा कुमक व पोलीसांची वाहने तैनात करण्यात आली होती.


या बंद मध्ये अचानक अनेक शाळा महाविद्यालय बंदमध्ये सहभागी झाल्याने शालेय मुलामुलींची मोठी कुचंबना झाली .सातारा शहर बस वाहतूक तसेच रिक्षा बंद असल्यामुळे बसस्थानकापासून प्रवाशांना चालते जा करावी लागली .परळी भागातील अनेक बस उशिरा धावत असल्यामुळे राजवाडा बस स्थानक परिसरात प्रवासी व शालेय मुला-मुलींची घरी जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हा बंद सातारा शहरासह उपनगरातही पाळला गेला परिसरातील सर्व पेट्रोल पंप बंदमध्ये सहभागी झाले होते. बँका तसेच पोस्ट ,सहकारी संस्था या मात्र आपली शटर अर्धी बंद करून सुरू होत्या. उपनगरातील अनेक शाळा रोज प्रमाणे सुरू राहिल्या. हा बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते हा बंद यशस्वी केला तर शहरातील व्यापारी उद्योजक यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले यामध्ये कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस खात्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

सातारा शहरात वंचित आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोवई नाका परीसरातील अनेक व्यवसायीकांनी बंद मध्ये सहभाग घेतला. राजपथावरही तुरळक वाहनांची ये - जा सुरु होती. तर दुकाने बंदच होती. राजवाडा परीसरात रोज गजबजलेला रिक्षा स्टॉप व गोलबाग परीसर सुनासुना दिसत होता. या बंद मध्ये अचानक काही महाविद्यालय व शाळा बंद झाल्याने परळी भागात परत जाण्यासाठी प्रवासी व विद्यार्थी विद्यार्थीनींनी बराच काळ बसची प्रतिक्षा केली
 महाराष्ट्र बद मध्ये सातारा शहरातील अनेक शाळा महाविद्यालये बंद असल्या कारणाने मुला मुलींंची मोठी कुचंबना झाली. अनेकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर धडक घेवून बंद का चालू याची शहानिशा केली. तर ग्रामीण भागातील एस टी बसेस तुरळक प्रमाणात सुरु असल्याने प्रतिक्षा करत प्रवाशांनी रस्त्याकडेलाच बसकण मांडली होती.