Your Own Digital Platform

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन


स्थैर्य, सातारा : स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्यातून आधार देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
 
स्त्रीवादाच्या प्रत्यक्ष कार्यकर्त्या, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या ‘नचिकेत’ या त्यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दुपारी २ ते ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
 
स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची प्रत्यक्ष मांडणी करत महिलांच्या उन्नतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्यभर काम केले. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचा भक्कम आधार गेला आहे. स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्याचा आधार देत समाजाला जागे करण्याचा प्रयत्न विद्या बाळ यांनी केला.

 पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रभात रोड येथील निवासस्थानी ठेवणार