Your Own Digital Platform

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करताना सुधिर चव्हाण व मान्यवर पदाधिकारी.

स्थैर्य, वडूज : महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शीतलकुमार बोबडे, कार्यवाहक मंदार जोशी, खजिनदार अमोल नलावडे, उपाध्यक्ष सचिन पवार व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ही संघटना वित्त विभागाची सर्वात मोठी संघटना असून संघटनेच्या बर्‍याच वर्षांपासून महालेखापाल कार्यालयातील वेतनश्रेणी सारखी समकक्ष वेतन श्रेणी सहाय्यक लेखा अधिकारी यांना लागू करणे, चक्राकार बदली बाबत या संवर्गस वगळणेत यावे आदी मागण्या बाबत त्यांना निवेदन देण्यात आले. वरील मागण्यांबाबत तातडीने विचारविनीमय करण्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.