Your Own Digital Platform

मुधोजी महाविद्यालयात पत्रकार दिन साजरास्थैर्य, फलटण: दि. 6 जानेवारी रोजी राज्यवृत्तपत्र दिनाच्या निमित्ताने मुधोजी महाविद्यालय प्रसिध्दी समितीच्या वतीने पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास फलटण शहरातील बहुतांश पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
यावेळी समिती प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आजच्या दिनाचे महत्त्व विशद करून आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे पत्रकारीतेतील योगदान सांगीतले. आजची पत्रकारिता व सद्यस्थितीतील पत्रकारांसमोरील आव्हाने याबाबतही त्यांनी आपले विचार मांडले. गेल्या वर्षभरात पत्रकार बांधवानी अत्यंत निष्ठेने व परिश्रमपूर्वक केलेल्या कार्याबद्दल मा. प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड याचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार मुगुटराव कदम, किरण बोळे व प्रसन्न रूद्रभटे यांनीही आपले विचार मांडले.

महाविद्यालयातील विविध उपक्रमांना उचित प्रसिद्धी मिळण्याकामी काही महत्वपूर्ण चर्चाही यावेळी झाली. मा. प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी महाविद्यालयाच्यावतीने उपस्थित पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.
 
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रबंधक शिवाजी रासकर व प्रसिद्धी समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रा. डॉ. नितीन धवडे यांनी आभार मानले.