Your Own Digital Platform

साताऱ्यात मंत्री कडू यांच्या कारवाईच्या भितीने शिक्षण विभाग गारठले


स्थैर्य, सातारा : भ्रष्टचाराचे आगार अशी खाजगीत चर्चा होत असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला गेला.निवेदन देवूनही कारवाई होत नसल्याने अखेर शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या साताऱ्यातील दौऱ्यात त्रस्त कार्यकर्ते व पालकांनी लेखी निवेदन दिले.त्यावेळी शिक्षण विभागाच्या दोषी आधिकऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही शिक्षण विभाग गारठून गेले आहेत.कोण आपल्यासाठी शेकोटी पेटवील याची शोधाशोध सुरू झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,सातारा शहरातील करंजे येथील के एस डी शानभाग व यादोगोपाळ पेठ येथील जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे एकशेवीस विद्यार्थ्यांच्या पालकांनी वेळेत शुक्ल भरले नाही म्हणून शाळेच्या चाचणी परीक्षेत बसू दिले नाही. त्यांना दिवसभर शाळेच्या आवारात उभे केले होते.त्याबाबत शिक्षण विभागाला कळवून सुध्दा'' हम करे सो कायदा'' वृत्तीने वागणाऱ्या काही अधिकाऱ्यांना थेट शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकारी यांनाच कारवाईचे आदेश देऊन आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.कुंभकर्ण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना आता रात्रीच्या वेळी सुध्दा शिक्षण राज्यमंत्री कडू यांची प्रतिमा दिसू लागली आहे.ही कारवाईची नांदी मानण्यात येत आहे.

विनाअनुदानित व अनुदानित शाळा म्हणजे अलीकडच्या काही काळात सातारा जिल्ह्यात टोलनाके बनले होते. पिते दूध मिटुनी,,जात मांजराची,,,,अशी अवस्था असूनही शिक्षण विभागाच्या कामकाजावर दिवाळीचे फटाके व स्तुतीसुमने वाहिली जात होती.गोड-धोड मिठाईची देवाणघेवाण केली जात होती.पण,राज्यमंत्री कडू यांच्या गुणकारी कडू डोस मिळाल्याने अनेकांचे आजार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.

सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीर शिक्षक भरती व पदोन्नतीबाबत निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला.सत्य परिस्थिती उघड होऊनही माध्यमिक शिक्षण विभाग कागदीघोडे नाचवू लागले आहे.याबाबत लवकरच संबधित शिक्षण मंत्री व राज्यमंत्री यांची काही सामाजिक कार्यकर्ते भेट घेणार आहेत.असे खात्रीलायक वृत्त समजले आहे.शिक्षण विभागात राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी लक्ष घातल्याने साताऱ्यात पालकांनी समाधान व्यक्त केले असून रिपब्लिकन पक्ष (अ गट) एकमेव अधिकृत पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,सिद्धू समिणद्र,बंटी गायकवाड,उदय राठोड,किरण ओव्हाळ व पालकांनी राज्यमंत्री कडू यांच्या निःपक्षपाती भूमिकेचे स्वागत केले