Your Own Digital Platform

जिल्हा बँकेची वाई, सोनगीरवाडी शाखा उदया स्वमालकीच्या इमारतीत



मा. खासदार श्री.शरदचद्रजी पवार यांच्या हस्ते उदया उदघाटन


स्थैर्य, सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेकविध योजना राबविल्या आहेत , यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणेस मदत झालेली आहे.

बँकेने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सुविधा व सेवा त्वरित उपलब्ध व्हाव्यांत याकरिता २७२ शाखा व ४६ विस्तारीत कक्षांचे जाळे कूषी-सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे.ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतीमान करणेसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत . कृषि व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शेतकरी सभासदांचे
आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे रहानीमान उंचावणेसाठी बँक जलसिंचन, कृषि यांत्रिकीकरण, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, जमीन सुधारणा,शेतकरी निवास, सामान्य कर्ज, ग्रामीण शौचालय इत्यादि विविध योजनांसाठी तसेच जिल्हयातील सहकारी साखर कारखाने, सह . खरेदी विक्री संघ, दूध पुरवठा संघ, पगारदार नोकरांच्या सह. पतसंस्था, बँका इत्यादि संस्थांना त्याचप्रमाणे बँकेच्या व्यक्तीगत ग्राहकांना त्यांच्या दैनदिन व अन्य गरजांसाठी सोनेतारण कर्ज व्यवहारांपासून वाहन खरेदी, व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा करीत
 आहे. पिक कर्जापासून ऊस तोडणी यंत्रापर्यत व सायकलपासून पोकलँन्ड पर्यंत कर्जाची सुविधा निर्माण केलेली आहे . यामुळे सातारा जिल्हा बँक सर्वसामान्यांचे कुटुंबाचे आर्थिक प्रगतीचा हिस्सा बनली आहे.

बॅकेच्या विभागीय कार्यालय वाई व सोनगिरवाडी ता.वाई शाखा स्वमालकीचे नवीन इमारतीचा उदघाटन कार्यकम शनिवार दिनांक १ फेबुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा .खा , श्रीनिवास पाटील,बॅकेचे अध्यक्ष मा, आ . श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,मा ,आ ,मकरंद पाटील,मा ,आ .दिपक चव्हाण,जिल्हा परीषद अध्यक्ष श्री.उदय कबुले तसेच संचालक मंडळाचे उपस्थितीमध्ये होणार असलेचे बॅकेचे संचालक मा. श्री.नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी कळविले आहे. या निमित्त बॅकेचे संचालक व सहकार व पणन मंत्री मा.ना ,श्री.शामराव उर्फ बाळासाहेब पाटील तसेच मा.खासदार श्रीनिवास पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

तरी, या शुभारंभास ग्राहकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बॅकेचे अध्यक्ष मा.आ. श्रीमंत छत्रपती शिवेद्रसिहराजे भोसले तसेच सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.