Your Own Digital Platform

पिंपरी-चिंचवडच्या स्वयंसिद्धा कला क्षेत्र पुरस्काराने शुभांगी शिंदे सन्मानित


स्थैर्य, फलटण : स्वयंसिध्दा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे यांच्यावतीने दिल्या जाणार्‍या ’स्वयंसिध्दा कला क्षेत्र’ या राज्यस्तरीय पुरस्काराने फलटण येथील शुभांगी शिंदे यांना समारंभपुर्वक सन्मानित करण्यात आले.
 
प्रतिभा विद्यालय, चिंचवड येथे स्वयंसिध्दा प्रतिष्ठाण यांच्यावतीने दुसरे राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचा शुभारंभ प्रतिभा शैक्षणिक संकुलचे सचिव डॉ. दिपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक‘माचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिका विनिताताई ऐनापुरे यांनी भुषविले. यावेळी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सविता ताई इंगळे, प्रतिभा शैक्षणिक संकुलचे मु‘यकार्यकारी अधिकारी राजेंद्र कांकरीया आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
 
शुभांगी शिंदे या एकपात्री प्रयोग कलाकार म्हणून राज्यात परिचित आहेत. राज्यासह आसाम, तेलंगाना येथेही त्यांचे हिंदीतून एकपात्री प्रयोग झाले आहेत. याशिवाय विविध विषयांवर मार्गदर्शन, बचत गटांना मार्गदर्शन, ’यशाचा मार्ग’ या विषयावर अनेक कार्यशाळाही त्यांनी घेतल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्या‘याने, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे मेळावे, चर्चासत्रे यांचे आयोजन व मार्गदर्शन, राज्य शासनाच्या लोकचेतना अभियानांतर्गत राज्यातील खेड्यापाड्यांना भेटी, उदबोधक गिते, पथनाट्य लेखन व सादरीकरण, काव्य लेखन, विविध शोध निबंधांचे लिखान या सार‘या विविध उपक‘मांची दखल घेउन शिंदे यांना आजवर राज्यात व अन्य राज्यातूनही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याच बरोबर सह्याद्री वाहिनी, न्यूज 18 लोकमत, तेलंगाना वाहिनीवरही त्यांच्या मुलाखती व अन्य कार्यक‘म प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या या उ‘ेखनीय कामगिरीची दखल घेउनच त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
याबद्दल शुभांगी शिंदे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.