Your Own Digital Platform

एम आर एफ मोग्रीप सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सातारचे ईक्षण शानभाग व श्‍लोक घोरपडे प्रथम व व्दितीय विजेते

पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एम आर एफ मोग्रीप सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या ईक्षण संकेत शानभाग व श्‍लोक विक्रम घोरपडे या दोघांनी चित्त थरारक कसरती करुन पहिला व दुसरा विजेतेपदाचा मान मिळविला

स्थैर्य, सातारा : नुकत्याच संपन्न झालेल्या एम आर एफ मोग्रीप सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या ईक्षण संकेत शानभाग व श्‍लोक विक्रम घोरपडे या दोघांनी ही स्पर्धा अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमाने जिंकली आहे. 12 वर्षाखालील स्पर्धेच्या या गटात ईक्षण याने प्रथम क्रमांक मिळवला तर श्‍लोक ने व्दितीय क्रमांक मिळवला. ईक्षण व श्‍लोक हे दोघे शानभाग विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत आहेत. ईक्षण हा गेली सहा वर्षे केटीएम बाईक वरुन या स्पर्धेत मोठ्या अनुभवाने सहभागी झाला होता.
 
तर श्‍लोक गेली तीन वर्षे कावासाकी बाईकवरुन सराव करत आहे. या स्पर्धेत मागील वर्षात एकूण सहा राऊंड झाले. त्यामध्ये देशातील कोईमतूर, बेंगलोर, गोवा, नाशीक, बडोदा आणि पुणे येथे या स्पर्धांचे राऊंड संपन्न झाले. श्‍लोक ने मिळवलेले विजेतेपद हे त्याच्या बेंगलोर येथील माजी. नॅशनल चॅम्पियन प्रशिक्षक जोशूआ प्रमोद यांना अर्पण केले आहे.
 
या यशाबद्दल ईक्षण व श्‍लोकचे शाळेचे संस्थापक व जेष्ठ क्रिडा मार्गदर्शक रमेश शानभाग विश्‍वस्त सौ. उषा शानभाग संचालिका सौ. आंचल घोरपडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनिधी, शालेय शिक्षक शिक्षिका, पालक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.