Your Own Digital Platform

डोळेगाव सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा : अजिंक्य पॅनेलकडून वाघेश्वरी पॅनेलचा 13-0ने धुव्वा


स्थैर्य, सातारा : संपूर्ण सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या डोळेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या अजिंक्य पॅनेल ने विरोधी वाघेश्वरी परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव केला. अजिंक्य पॅनेलने सर्व १३ जागा मोठ्या फरकाने जिंकून वाघेश्वरी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला.
 
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोसायटीचे चेअरमन सोमनाथ गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य पॅनलचे सर्व उमेदवार 65 ते 80 मतांच्या फरकाने विजयी झाले. अजिंक्य पॅनेलचे कदम शंकर,गोडसे तुकाराम, गोडसे रवींद्र, गोडसे रामचंद्र, गोडसे साहेबराव, गोडसे संतोष, शेलार कृष्णत,शेलार विष्णू , गोडसे नलिनी, गोडसे पारुबाई, रणदिवे जगन्नाथ, कदम नारायण, शेलार प्रविण हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रम पवार, सोमनाथ गोडसे यांच्यासह पॅनेल प्रमुख गोरख गोडसे, अमित गोडसे, सोपान शेलार, सत्यवान गोडसे, गोकुळ गोडसे, लक्ष्मण गोडसे, रामदास शेलार, प्रवीण काळंगे, प्रताप गोडसे, राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते.
 
अजिंक्य पॅनेल ला सोसायटीच्या सभासदांनी एकहाती सत्ता दिली असून आदर्श कारभार करून सभासदांचा विश्वास नवनिर्वाचित सदस्य सार्थ ठरवतील आणि सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची उन्नती साधतील असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.