Your Own Digital Platform

साताऱ्याचा मिहीर जोशी सनदी लेखापाल परीक्षेत भारतात 25 वा

 

स्थैर्य, सातारा : साताऱ्याचे प्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट मकरंद जोशी यांचा मुलगा मिहीर हा सीए फाउंडेशन परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकला आहे . संपूर्ण भारतातून तो 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे . मिहीर जोशी याने 400 पैकी 339 गुण संपादन करून हे यश संपादन केले .

नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशनच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला . साताऱ्याचा मिहीर मकरंद जोशी या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकल्याची खबर येताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे . प्रसिध्द चार्टर्ड अकाउंटंट मकरंद जोशी यांचा मिहीर हा चिरंजीव असून तो साताऱ्याच्या गुरूकुल शाळेचा विद्यार्थी आहे . मिहीरने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात पूर्ण केले .सीए फाउंडेशनच्या तयारीसाठी मिहीरने पुणे येथे खाजगी संस्थेत प्रवेश घेतला होता . इयत्ता दहावीला मिहीरने99.40 टक्के व बारावी इयत्तेत 96 टक्के मार्क मिळवले होते .. यशाची तीच परंपरा त्याने पुढे सुरू ठेवली आहे .आजपर्यंत सनदी लेखापाल ( सीए ) या परीक्षेत सातारा जिल्ह्यातून कोणीही गुणवत्ता यादीत आले नव्हते . मिहीर ने या निमित्ताने वेगळ्या यशाची नोंद केली आहे . मिहीरने बुद्धिबळ स्पर्धातही देशपातळीवर रौप्यपदक मिळवले आहे . कसून सराव, मांडणीत अचूकता यावर लक्ष ठेऊन अभ्यास केला . वडिल मकरंद व आई मंजिरी यांनी मला भक्कम पाठिंबा दिल्याचे मिहीर याने प्रभातशी बोलताना सांगितले .गुरूकुल शिक्षण संस्थेचे प्रमुख राजेंद्र चोरगे यांनी मिहीरचे या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले .