Your Own Digital Platform

बिल्डर्स असोसिएशच्या घरकुल मेळाव्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण - किशोर शिंदे


घरकुल मेळाव्याला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थैर्य, सातारा : सर्वसामान्य माणसाला आपल्या बजेटनुसार हक्काचे घर मिळणे अवघड होत चालले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या घरकुल मेळाव्यामुळे सातारकरांना एकाच ठिकाणी फ्लॅटस्, प्लॉटस् व कमर्शिअल प्रोजेक्टस्ची माहिती मिळणार असून सर्व सामान्यांचे आपले घराचे स्वप्न आपल्या बजेट मध्ये पूर्ण होणार असल्याचे उद्गार सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी काढले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित घरकुल मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे बोलत होते. यावेळी बँक  ऑफ महाराष्ट्राचे  झोनल मॅनेजर वसंत गागरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, सेक‘ेटरी श्रीराज दीक्षीत, उपाध्यक्ष अनुप शिंदे, माजी अध्यक्ष रामदास जगताप, सचिन देशमुख, मंगेश जाधव, संतोष जगताप, हनुमंत वळसे, पृथ्वीराज पाटील, अनिल दातीर, क‘ीडा संघटक इर्शाद बागवान, बन्सीशेठ असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठया सं‘येने उपस्थित होते.
 यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजन वसंत गागरे यांनी बिल्डर्स असोसिएशनचे घरकुल मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कौतुक केले व यापुढेही असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे म्हणारले की,  आपल्या घराचे स्वप्न साक्षात पूर्ण करणार्‍या घरकुल मेळाव्याचे आयोजन बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेतर्फे दि. 1 व 2 फेब‘ुवारी 2020 रोजी करण्यात आले आहे. घरकुल मेळाव्याचे आयोजन अलंकार हॉल, पोलीस करमणुक केंद्र येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. घरकुल मेळाव्यात 45 स्टॉल्स असून सातारा जिल्हा व अन्य ठिकाणचे नामंवंत बिल्डर्स, डेव्हलपर्स, वित्तीय संस्था व अन्य साहित्याचे स्टॅाल्स् यामध्ये सहभागी झाले आहेत.  घरकुल मेळाव्यात तुमच्या बजेट व लोकेशन नुसार सर्व पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्वरीत कर्ज सुविधाही वित्तीय संस्थांतर्फे मिळणार आहेत. सातारा शहरातील सर्व नामवंत बिल्डर्स या मेळाव्यात सहभागी झाले असून सातारा शहराच्या चारही दिशांचे रेसिडेन्सीअल, कमर्शिअल तसेच प्लॉटींग प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली सातारकरांना उपलब्ध होणार आहेत.

यावेळी मान्यवरांचे स्वागत असोसिएशनतर्फे अध्यक्ष अशोक शिंदे, सेक‘ेटरी श्रीराज दिक्षीत उपाध्यक्ष अनुप शिंदे, पृथ्वीराज पाटील यांनी केले. कार्यक‘माचे सूत्रसंचालन मंगेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्रीराज  दिक्षीत यांनी केले. घरकुल मेळाव्या पहिल्या दिवसापासूनच सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.