Your Own Digital Platform

श्री. छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज विविध सामाजिक व धार्मिक कार्यक‘मांचे आयोजन


स्थैर्य, सातारा : सातार्‍याचे भाग्य विधाते, माजी सहकारमंत्री श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृती दिनानिमीत्त मंगळवार दि. ४ रोजी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गांधी मैदान, राजवाडा येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (बिड) यांच्या सुश्राव्य किर्तन व प्रवचनाचा कार्यक‘म होणार आहे.

स्व. अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीदिनानिमीत्त शाहुनगर- शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अजिंक्य उद्योग समुहाच्यावतीने स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण व पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन कार्यक‘म होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचणी येथे ग‘ामस्थांच्यावतीने भजन, किर्तन व अभिवादनाचा कार्यक‘म होणार आहे. शेंद्रे ङ्गाटा येथे सायंकाळी ५ वाजता रुद्रनिल सोशल ङ्गोंडेशन या सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापनदिनाचा कार्याक‘म होणार आहे. तसेच सातारा नगरपरिषद, सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक‘म होणार आहे. भरतगाव येथील भैरवनाथ सामाजिक विकास संस्थेच्यावतीने अभिवादन कार्यक‘म होणार आहे. यासह विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक‘म, खाऊ वाटप आदी कार्यक‘म होणार आहेत.

सायंकाळी ६.३० वाजता राजवाडा, गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग‘ुपच्यावतीने भारतात प्रवचनाची पताका उंचविणारे थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक आंतरराष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (बिड) यांच्या सुश्राव्य किर्तन व प्रवचनाचा कार्यक‘म होणार आहे. या कार्यक‘मास ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. निंबाळकर महाराज (कोंडवे), वासोळे भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे. या धार्मिक कार्यक‘माचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग‘ुपच्यावतीने करण्यात आले आहे.