Your Own Digital Platform

वसतराव एक स्मरण एक अविस्मरणीय संध्याकाळ


स्थैर्य, सातारा : रविवार २ फेब्रुवारी २ ० २ ० ची संध्याकाळ सातारकर रसिक कधीच विसरू शकणार नाहीत. निमित्त होते पंचम ग्रुप सातारा आणि व्हयोड़ि अकॅडमी पुणे यांनी आयोजित केलेल्या वसंतोत्सव - वसंतराव एक स्मरण ! ही मैफिल. वसंतोत्सव हा कार्यक्रम दरवर्षी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान यांच्या वतीने पुणे-मुंबई येथे आयोजित केला जातो. सन २०२० हे वर्ष पं वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष.पुणे- मुंबई या व्यतिरिक्त आणखी काही शहरातून हा कार्यक्रम करण्याचे प्रतिष्ठानने ठरविले त्यातला हा पहिला कार्यक्रम पंचम ग्रुपच्या प्रयत्नाने साताऱ्यात आयोजित करण्यात आला.

 जिल्हा परिषदेचे यशवंतराव सभागृह रसिकांनी भरून गेले होते आणि रंगमंचही अनेक नामवंत कलाकारांनी सजला होता. उजव्या बाजूला सत्यजित प्रभू सिंथेसायझर वर तर शेजारी अमर ओक बासरी घेऊन सन्ञ होते शेजारी सरोद वर सारंग कुलकर्णी तर आदित्य ओक संवादिनीवर. शेजारी सहकलाकार प्रियांका बर्वे आणि मुख्य कलाकार राहुल देशपांडे त्यांच्या उजव्या बाजूस निवेदिका स्पृहा जोशी आणि निवेदक वैभव जोशी आणि
अगदी डाव्या बाजूस तबल्यावर निलेश रणदिवे . माहोल तर मोठे मस्त जुळून आले होते.

रंगमंचावर वाद्यवृंदाची धून चालू होती.पं. वसंतराव देशपांडे त्यांच्या सांगीतिक जीवनाची सुरूवात नाटकातील गाणी म्हणण्या पासुन होती. सहाजीकच राहुल देशपांडे यांनी आजोबांनी संगीत सौभद्र नाटकात नारदाची भूमिका करताना म्हटलेले राधाधर मधु मिलिंद जय जय या नाट्य गीताने केली. सहसा न ऐकायला मिळणार्या या नाट्य गीतानंतर राहुल देशपांडे यांनी राजमान्य दरबारी कानडा या रागातील आलापी आणि वसंतरावांच्या गायनातील सहज फिरत असलेल्या ताना याची आळवणी करीत याच रागातील गोविंद बल्लाळ देवल यांच्या संशय कल़ोळ नाटकातील मृगनयना रसिक मोहिनी हे गीत सादर केले यानंतर सबकुछ पुलं अशी प्रसिद्धी मिळालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील ही कुणी छेडिली तार हे गीत प्रियांका बर्वे यांनी सादर केले.

कार्यक्रमाचे स्वरूप केवळ एकामागून एक गाणी म्हणणे असे नसून निवेदक वैभव जोशी आणि स्पृहा जोशी हे वसंतरावांच्या जीवनातील काही प्रसंग वर्णन करून सांगत होते.वैभव जोशी हे स्वतः उत्तम कवी असल्याने राहुल देशपांडे हे वसंतरावांच्या जीवनावर एक चित्रपट काढीत आहेत त्यातील गीते वाचून दाखवत होते. कार्यक्रम रंगतदार होत हळू हळू पुढे सरकत होता. भावगीत गायन हेही वसंतरावांना वर्ज नव्हते .सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांना वसंतराव एकदा म्हणाले अहो खळे! आम्हालाही तुम्ही संगीतबद्ध केलेले एखादे गाणे म्हणू द्या ना! खळे म्हणाले तुमच्यासाठी गाणे संगीतबद्ध करणे ही माझी परीक्षा आहे पण कवी वा रा कांत यांनी लिहिलेली दोन गीते वसंतरावांनी म्हटली आहेत. वरवर सोपे वाटणारे पण म्हणायला अतिशय कठीण असलेले भावगीत राहिले ओठातल्या ओठात वेडे, शब्द माझे राहिलेले हे भावगीत राहुल यांनी अत
वसंतराव देशपांडे यांचे मित्र मंडळ फारच मोठे होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांड आणि वसंतराव यांची खास मैत्री होती. वसंतरावांच्या व्यक्तिमत्वावर ची पु. ल.देशपांडेयांची एक छोटीशी क्लिप या मैफिलीत दाखवली गेली.

आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांचे जीवन, आणि यांची गायकी याची राहुल यांची भावनिक बांधिलकी जबरदस्त आहे. देवयोग्ही असा आहे की वसंतरावांची गायकी एका पिढीची उडी मारून राहुलच्या गळ्यात उतरली आहे. पं. वसंतराव देशपांडे आणि पं कुमार गंधर्व यांचेही एक ममत्व होते. राहुल देशपांडे यांनी सांगितलेली या दोघांच्या शेवटच्या भेटीची आठवण हृदय हेलावून टाकणारी आहे.दोघेही हातात हात घेऊन पाच मिनिटे निशब्द बसले होते आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वहात होते. कदाचित शेवटची भेट आहे याचा दोघांनाही साक्षात्कार झाला असावा.

राहुल देशपांडे निर्मित चित्रपटा चे शेवटचे गीत हे वैभव जोशीनी लिहिलेले आहे ते त्यांनी वाचून दाखवले कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले. आता समे वरी हे, कैवल्य दान झाले।। चरणावरी स्वरांच्या,मी टेकवून माथा। अर्पून चाललो मी, माझी अबोल गाथा।। वसंतरावांच्या जीवनगाथेचे सार्थ चित्रण करणारे हे काव्य राहुल देशपांडे यांनी एका निर्गुणी भजनचि चाल दिलेले हे गीत गायले.डोळे मिटून ऐकताना अनेकांच्या डोळ्यातून वहाणारे
अश्रू अनावर करून गेले.

सुमारे सव्वा सहा वाजता सुरू झालेली ही मैफल रात्री साडे नऊ नंतर संपली. या कार्यक्रमात राहुलजींनी स्वत: पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी सांगून कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. राहुल देशपांडेच्या शब्दात सांगायचे तर सातारकर रसिकांच्या समोर आज मी मनापासून काहीही हातचे न राखता गायलो! उद्याच्या मेफिलित काय होईल ते मलाच माहीत नाही!

कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचे स्वागत पंचम चे संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता काळे आणि पु ना गाडगीळ चे आनंद देवकाळे यांनी केले .बाकी सर्व कलाकारांचे यथोचित स्वागत पंचम च्या कार्यकारिणीने केले. सर्व प्रायोजकांच्या सत्कार श्री राहुल देशपांडे यांनी केला. पंडित वसंतराव देशपांडे यांनी नाट्यसंगीताच्या चळवळीचा प्रवाह जुन्या पिढ्यांमध्ये निर्माण केला तो नवीन पिढीमध्ये प्रवाहित ठेवण्याचे कार्य राहुल जी करत आहेत . या थोर कार्याबद्दल सर्व सातारकरांच्या वतीने व अशोक मोदी यांच्या सहकार्याने सातारी कंदी पेढ्याचा हार पंचम चे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांच्याहस्तेघालण्यातआला. कार्यक‘माच्यासुरुवातीससंगीताचेगाढे अभ्यासक श्रीराजेंद्र मणेरीकर यांनी पंडित वसंतरावदेशपांडे यांच्यावर लिहिलेल्यासुंदरलेखाचे वितरणराहुलदेशपांडे, मंचावरीलसर्व कलाकारतसेचप्रेक्षकांमध्येकरण्यात आले. कार्यक‘माचेअतिशय नेटके निवेदनअमेय आगटे यांनीकेले.