Your Own Digital Platform

मृत्यूनंतरही ओठावर ज्याचे नाव राहते तोच किर्तीवंत होय ह.भ.प. समाधान

गांधी मैदान येथे किर्तन सादर करताना ह.भ.प. समाधान महाराज शर्मा. समोर उपस्थित जनसमुदाय

 मृत्यूनंतरही ओठावर ज्याचे नाव राहते तोच किर्तीवंत होय : ह.भ.प. समाधान महाराजांच्या किर्तनाने सातारकर भक्तीरसात न्हाले

स्थैर्य, सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मीती करुन जनकल्याण साधले. मानवालाच नव्हे तर, देवालाही कर्म चुकलेले नाही. मात्र चांगले कर्म करुन छ. शिवाजी महाराज अमर झाले. शिवाजी महाराज देव नव्हते पण, त्यांच्यामुळेच देवळात देव राहिले. छत्रपती शिवरायांराचा समाजकार्याचा, जनकल्याणाचा वारसा छत्रपतींच्या घराण्यात जन्मलेल्या अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी अविरत जोपासला. थोर महात्म्यांचेच पुण्यस्मरण केले जातेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज आणि उद्याही कायम राहणार आहे. त्याच पध्दतीने किर्तीवंत असलेल्या भाऊसाहेब महाराजांचे नाव १६ वर्ष झाले तरी घेतले जाते आणि यापुढेही कायम घेतले जाईल. मृत्यूनंतरही अशा महात्म्यांची नावे कायम ओठावर राहतात ती त्यांच्या किर्तीमुळे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पश्‍चात त्यांचे सुपुत्र आणि असं‘य कार्यकर्ते हा वारसा पुढे चालवत असून असे उदाहरण क्वचीतच पहावयास मिळते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ‘यातीचे किर्तनकार, थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (बिड) यांनी केले.

गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग‘ुपच्यावतीने स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त आयोजित किर्तन, प्रवचन सोहळ्यात ह.भ.प. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा बोलत होते. यावेळी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. श्रीपती माने, ह.भ.प. उमेश किर्दत महाराज आदी मान्यवरांसह हजारो सातारकर नागरिक आणि महिला उपस्थित होते.

किर्तनाच्या सुरुवातीला रसाळ अंभंगवाणीने आणि टाळ- मृदुंगाच्या गजराने सातारकर भक्तीरसात ओलेचिंब झाले. अभंगवाणीत त‘नी झालेल्या सातारकरांना ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी संत तुकाराम महाराजांच्या आठवे देव तो करावा उपाव, येर तजीं वाव खटपटा. होई बा जागा होई बा जागा, वाउगा का सिणसिल. जाणिवेच्या भारे भवाचिये डोही, बुडसी तों काहीं निघसि ना. तुका म्हणे देवा पावसील भावें, जाणता ते ठावें काही नव्हे. या अभंगावर किर्तन सादर करुन वास्तवाचे भान करुन दिले. आपल्या खास विनोदी शैलीत अनेक विनोदी किस्से सांगून समाधान महाराजांनी उपस्थितांना खळखळुन हसायला लावले. त्याच पध्दतीने जीवनातील अनेक वास्तववादी उदाहरणे देवून श्रोत्यांच्या डोळ्यातील पाण्याला वाटही करुन दिली.

छत्रपतींच्या घरासमोर किर्तन करण्याचे भाग्य आज लाभले आहे. ज्या भाऊसाहेब महाराजांनी साधेपण जपलं. त्यांचे सुपुत्र माझ्यासमारे जनसमुदायात बसून किर्तन ऐकत आहेत. हे साधेपण म्हणजेच या लोकांचे खरे राजेपण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कौतुक करण्याची पात्रताच कोणाची नाही. अशा महान राजाचे नाव ओठावर घेतले की अंगावर शहारे येतात. अशा किर्तीवंत राजाच्या घराण्यात अभरसिंहराजेंसारखा किर्तीवंत राजा झाला. त्यांच्या कार्यामुळेच त्यांचे नाव आजही घेतले जाते आणि पुढेही घेतले जाईल. अशा महात्म्यांच्या निघून जाण्याचे शिवेंद्रराजे पोरके झाले. त्यांचे पोरकेपण कशानेही भरुन येणार नाही. पण, दुख बाजूला सारून शिवेंद्रराजे त्यांच्या पित्याचा वारसा दिमाखाने पुढे नेत असल्याने आनंद होत आहे. आजच्या पिढीसमोर शिवेंद्रराजे एक आदर्श आहेत. त्यामुळे युवा पिढीने आणि खास करुन मुलींनी तोंडाला पांढरं ङ्गासून बापाचे तोंड काळं होईल, असे वागू नये, असे आवाहन समाधान महाराज यांनी यावेळी केले.

या भूतलावर कोणीही अमर नाही. जो चांगले कार्य करतो त्याचेच नाव शेवटपर्यंत राहते. स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजकार्य करुन एक आदर्श निर्माण केला. त्यामुळेच आज त्यांचे नाव सर्वांच्या मुखी कायम आहे. त्यामुळे सतकर्म करा, दुसर्‍यासाठी जगा आणि आपले नाव अमर करा, असा संदेश समाधान महाराज यांनी किर्तनातून दिला. त्यांना गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर, वासोळे भजनी मंडळ यांनी साथ दिली. कार्यक‘माच्या सुरुवातीला विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
  कार्यक‘म यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग‘ुपच्या दिपक भोसले, विजय देशमुख, राजा महाडिक, जितेंद्र मोहिते, विलास कासार, प्रवीण पाटील, मधू ङ्गल्ले, राजेश जोशी, चंदन घोडके, दिलावर शेख, महेंद्र गार्डे, अनिल भोसले, राहूल धनावडे, ओमकार परदेशी, रवी पवार, सुजीत शेख आदींनी परिश्रम घेतले.

सकाळपासूनच स्व. भाऊसहेब महाराजांना विविध स्वराज्य संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले. शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. चिंचणी येथे ग‘ामस्थांच्यावतीने भजन, किर्तन व अभिवादनाचा कार्यकम झाला. तसेच सातारा नगरपरिषद, सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासह विविध विकाससेवा सोसायट्या व संस्थांच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक‘म झाला.