Your Own Digital Platform

श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ


स्थैर्य, फलटण : फलटण येथील अनेकांचे आराध्य दैवत असणार्‍या श्री.सदगुरू हरिबुवा साधु महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवास 30 जानेवारी पासुन प्रारंभ झाला असुन गुरुवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी उत्सवाचा प्रमुख दिवशी श्रींच्या पादुकांची पालखीतून नगर प्रदक्षिणा निघणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने कराण्यात आले आहे.

गुरुवार दिनांक 30 जानेवारी ते गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी अखेर रोज सकाळी 9 वाजता भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 30 रोजी सकाळी सकाळी 9 वाजता श्री. सदगुरू अवधूत भजनी मंडळातर्फे वीणापूजन होऊन श्रींच्या महोत्सावात सुरूवात झाली आहे. रोज सांयकाळी 4:30 वाजता ह.भ.प.श्री.यतीराज महाराज लोहोर यांचे भजन होईल .रोज दुपारी 2:30 वाजता अनुक्रमे माऊली महिला भजनी मंडळ,फलटण, केसकरबाई भजनी मंङळ फलटण, श्री सदगुरू हरिबुवा महाराज महिला भजनी फलटण , मीरा भजनी मंडळ, फलटण, केशवस्मृती भजनी मंडळ, फलटण, शारदा भजनी मंडळ, फलटण , दादा महाराज भजनी मंडळ ,फलटण यांचे भजन होईल .रोज राञी 9 वाजता अनुक्रमे हभप रामभाऊ जगताप गुरुजी वाठार निंबाळकर, हभप नंदकुमार कुमठेकर महाराज झणझणे सासवड, हभप विश्वास आप्पा कोळेकर महाराज नांदल, हभप आबा मोहिते महाराज मुळीकवाङी , हभप जालिंदर बनकर महाराज तावङी, हभप मारुती महाराज शिंदे ताथवङा यांची किर्तने होतील. बुधवार दिनांक 5 रोजी सांय. 5:30 वाजता दत्त चिल्ले भजनी मंडळ, फलटण यांचे भजन होईल .

गुरुवार दिनांक 6 रोजी भागवात कथा समाप्ती होणार असून सकाळी 10 वाजता श्री अवभूत भजनी मंडळ, फलटण यांचे काल्याचे भजन होईल .दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
शुक्रवार दिनांक 7 रोजी श्री सदगुरू हरिबाबा महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची पालखीतून नगर प्रदक्षिण दिंडी कारण्यात येणार असून सव कायक्रिमास भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.