Your Own Digital Platform

वन्यजीव मांडूळ व दुर्मिळ घुबडाची तस्करी करणाऱयाला अटक


स्थैर्य, सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये जबरी चोरी करणाऱया रेकॉर्डवरील संशयिताला अटक करण्यात यश आले, तर दुसऱया घटनेत 10 लाख रुपये किमतीचे वन्यजीव मांडूळ व दुर्मिळ घुबडाची तस्करी करणाऱया एकाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 1 फेब्रुवारी 2020 रोजी रोहित ज्ञानेश्वर आवळकर (रा. विटा, जि. सांगली) या इंजिनिअEिरग कॉलेज, सातारा येथे शिक्षण घेणाऱया तरुणास सातारा ते पुणे जाणाऱया रोडवर वाढे (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीतील हॉटेल अमर समोर दोन इसमांनी माझ्या बहिणीची छेड का काढली?, असा खोटा आरोप करुन तुला पोलीस स्टेशनला घेवून जातो, अशी धमकी देवून त्यास मारहाण करुन त्याचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहित आवळकर याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. या गुह्यातील मुख्य संशयित हा गुन्हा घडल्यापासून सापडत नव्हता.

दरम्यान, दि. 5 रोजी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुन्हय़ातील संशयित वाढे फाटा येथे फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली, त्यानुसार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड यांना पथकासह संबंधित ठिकाणी जावून संशयितास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने वाढेफाटा येथून संशयितास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. करण उर्फ बबलू छगन जाधव (रा. शिवथर, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.

तसेच गुन्हे प्रतिबंधक अनुशंगाने दि. 3 रोजी प्रसन्न जऱहाड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातारा शहरात पेट्रोलिंग करीत असताना सातारा-कोरेगाव जाणारे रोडवरील कृष्णानगर इरिगेशन कार्यालयाच्या गेटसमोर रोडवर एक इसम हातामध्ये पिशवी घेवून उभा असलेला दिसला. त्याचा वाजवी संशय आल्याने त्याची विचारपूस केली असता, तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एक तपकिरी रंगाचा सर्प (मांडूळ) व एक घुबड पक्षी आढळून आला. त्यास त्याबाबत विचारणा केली असता त्याने आपले नाव अनिकेत शंकर यादव (वय 29, रा. कृष्णानगर वसाहत, ता. सातारा) असल्याचे सांगितले. मांडूळ जातीचा सर्प व घुबड पक्ष्याची काळय़ा बाजारात चांगली किंमत येते म्हणून विक्री करण्याकरिता पकडले असल्याचे सांगितल्याने संशयित व 10 लाख रुपये किमतीचे मांडूळ व घुबड पक्षी पुढील कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याबाबत विभागीय वनअधिकारी कार्यालय सातारा येथे गुन्हा नोंद केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या दोन्ही कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, पोलीस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबीन मुलाणी, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, नीलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, चालक पोलीस नाईक संजय जाधव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.