Your Own Digital Platform

सहकारातील दिपस्तंभ; स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले


स्थैर्य, सातारा : सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. छ. शिवाजी महाराजांचा समर्थ वारसा चालवणार्‍या या राजघराण्याचा श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकिक कार्यकतृत्वाने नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालवणार्‍या स्व. अभयसिंहराजे भोसले उर्ङ्ग भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याची वेगळी ओळख जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर निर्माण केली. सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा कायापालट करणार्‍या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते. सहकारातील दिपस्तंभ ठरलेल्या स्व. भाऊसाहेब महाराज यांचा आज पुण्यस्मरण दिन. यानिमीत्त त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा...

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. याच ऐतिहासिक आणि वंदनीय घराण्यात स्व. भाऊसाहेब महाराजांचा जन्म झाला. राजघराण्यातील असलो तरी, आपण एक माणूस आहोत या भावनेतून संपुर्ण जीवनात स्व. भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट घेतले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन सर्मपीत केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर, त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतो, हे स्व. भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कतृत्वाने दाखवून दिले आहे. सामाजीक आणि राजकीयदृष्ट्‌या सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रुपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सहकार क‘ांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोर- गरीब, शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगिण विकास साधला.

राजकारणात सक‘ीय झाल्यानंतर विविध पदे सक्षमपणे सांभाळुन त्या पदाच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केला. सहकारमंत्री असताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी संपुर्ण राज्यात सहकारक‘ांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकाससेवा सोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आर्थिक सक्षम करण्याचे अनमोल काम स्व. भाऊसाहेब महारांनी केले. विना सहकार नही उध्दार हे ओळखुनच स्व. भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यामातून स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुकाच नव्हे तर, आसपासच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना हक्काची संस्था उभी करुन दिली. आज याच साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह आपसपासच्या तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळत आहे. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटूंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे, याच कारखान्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे आणि याच कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह परजिल्ह्यातीलच नव्हे तर, परराज्यातील सुध्दा असं‘य घरातील चुली दररोज पेटतात, ही वस्तुस्थिती आहे.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून उत्तम दर्जाचे सूत उत्पादीत केले जाते आणि हे सूत देशी व परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जात आहे. सूत गिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पातून निर्माण होणारी वीज वीज वितरण कंपनीला वितरीत केली जाते आणि यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समुहात विविध संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समुहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योगसमुहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकारक्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे.

राजकारणात सक‘ीय राहून राजकारणाला ङ्गारसे महत्व न देता समाजकारण करणार्‍या स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात सहकारक‘ांतीबरोबरच जलक‘ांती घडवून सातारा तालुक्याला कृषीप्रधान तालुका बनवले. उरमोडी धरण प्रकल्पाबरोबरच तालुक्यात ठीकठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग‘ामपंचायत इमारती उभ्या करुन प्रत्येक गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौङ्गेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग‘ेसर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भुमीका घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपले संपुर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. अखंडपणे जनतेची सेवा केली आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात आपला हक्काचा माणूस म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचा आजही आदराने उ‘ेख केला जातो. निगर्वी, शांत, संयमी, नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा जनसामान्यांचा राजा म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते आणि यापुढेही कायम घेतले जाईल. राजकारणात राहूनही राजकारण न करणारा, जातपात, गटतट न माणनारा आणि नेहमी समाजासाठी झटणार्‍या सर्वसामान्यांच्या या राजाला पुण्यस्मरण दिनानिमीत्त विनम‘ अभिवादन..!

अमर मोकाशी
(जनसंपर्क अधिकारी, सुरुची सातारा)