Your Own Digital Platform

फलटण नगरपालीकेचे वरीष्ट लिपीक यांना शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्कीस्थैर्य, सातारा : फलटण नगरपालीकेचे वरीष्ट लिपीक यांना शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्की केल्या प्रकरणी फलटण मधील दोनव्यक्तिवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गणपत पवार वय 55 वर्षे रा पवारगली फलटण हे फलटण नगरपालीका फलटण येथे वरिष्ठ लिपीक म्हणुन काम करत आहेत. त्याच्याकडे नगरपालीकेची गाळे वसुलीचे कामे असून दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालय फलटण येथील महात्मा फुले चौक येथील नगरपालीकेचे 27 गाळ्यांचे सोडत होती. महात्मा फुले चौकातील सर्व गाळे धारकांना बोलावून प्रत्येक गाळे धारकांना गाळ्याची चिठ्ठी काढण्यास लावली होती. यावेळी टपरी धारक बाळासो बाबुराव चव्हाण रा . कसबापेठ फलटण त्यांचे वतीने त्यांचा मुलगा ओमकार बाळासो चव्हाण व त्यांची पत्नी माधुरी बाळासो चव्हाण असे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गाळ्याची सोडत चिठ्ठी उचलण्यास नकार दिला. यानंतर नगर परिषदेचा सोडढतीचा कार्यक्रम पुर्ण करणेत आला . 

दिनांक 29 रोजी दुपारी 2 . 30 वाजण्याच्या सुमारास प्रकाश पवार यांना मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचा फोन आला की महात्मा फुले चौकातील खजीना हौदा समोरील नविन शॉपिंग सेंटर येथील गाळा क्रमांक 11 हा कुणीतरी उघडलेला आहे तेथे जाऊन तुम्ही पहा व सदर गाळा बंद करा असे फोनवरुन प्रकाश पवार यांना सांगीतले. प्रकाश पवार तेथे गेलो असता ओमकार चव्हाण व त्याचा पुतण्या हे दोघे तेथे गाळा नंबर 11 मध्ये अनधिकृतपणे टेबल व खुर्ची टाकुन बसले होते. त्यावेळी पवार त्यांना म्हणाले की सदर गाळ्यातील टेबल खुर्ची तुम्ही बाहेर काढा अजुन कोणालाही गाळे ताब्यात दिलेले नाहीत. यावर ओमकार चव्हाण व त्याचा पुतण्या हे पवार यांच्या अंगावर धाऊन येऊन गचोरे धरुन हाताने मारहाण केली . यावेळी पवार यांना शिवीगाळ करुन गाळा सोडत नाही तुला काय करायचे ते कर अशी दमदाटी केली.फलटण शहर पोलीस ठाण्याकडे प्रकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अोमकार चव्हाण व १ इसम यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.