Your Own Digital Platform

योग विद्याधाम तर्फे भव्य सुर्यनमस्कार स्पर्धा संपन्न


स्थैर्य, सातारा : योग विद्याधाम सातारा संस्थेच्या वतीने रथसप्तमीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती .कोटेश्‍वर मैदानासमोरील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सातारा येथे संपन्न झाली . ही स्पर्धा मुले व मुली यांच्या स्वतंत्र गटात अ वयोगटात इयत्ता 5 वी ते 7 वी व ब वयोगटात इयत्त 8 वी ते 10 वीच्या मूला मुलींना होती . 
 
. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सातारचे उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर योग विद्या धाम संस्थेच्या अध्यक्ष प्रा. शोभा पाटील, उपाध्यक्ष शैलजा ठोके, मृणाल कुलकर्णी, श्वेता कोल्हापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटात 162 जणांनी सहभाग घेतला. तर इयत्ता आठवी ते दहावी या गटात एकूण 96 स्पर्धक सहभागी झाले होते. दोन्ही गटात मिळून 258 जणांनी सहभाग नोंदविला ,तसेच सातारा येथील मूकबधिर शाळेचे सतरा जण या स्पर्धेत विशेष करून सहभागी झाले होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सविता कारंजकर यांनी केले. या स्पर्धेसाठी संस्थेचे 45 प्रशिक्षक व 30 पंचांनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले .या स्पर्धेत सातारा शहर परिसरातील 14 शाळा सहभागी झाल्या होत्या.

उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण म्हणाले की विविध उपक्रम राबविले जाताना आमचा शिक्षण विभाग सहभागी होतो तसेच गुणवत्ता शोधण्यासाठी अनेक स्पर्धा शिक्षण विभाग घेत असते. मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक करतो व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देतो. या स्पर्धेत आपणाला खऱ्या अर्थाने व्यायामाची व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात योगाचे व खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे लहानपणापासूनच व्यायामाची सवय लागली तर आयुष्य निरोगी बनेल.
 
या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज युवराज नाईक म्हणाले की समाजाकडून आजच्या जीवनातील बदलांसाठी दोष देऊ नका मुलांच्यात वाढते ताणतणाव कमी करण्यासाठी पालकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार व चांगल्या सवयी बिंबवणे महत्त्वाचे आहे आज शासनातर्फे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित होता इंडिया या योजनेत आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. महिला तसेच मुलींच्या आरोग्यासाठी विशेष योजना आणल्या जात आहेत प्रत्येकाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी शासन विविध खेळ योगासने यांचे प्रशिक्षण देत आहे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे बारा खेळाडू पदक मिळविणारी ठरले ही प्रगती सातारा जिल्हा करतो आहे याचे कौतुक वाटते सातारा येथील शाहू क्रीडासंकुलात योगासाठी विशेष सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील राहीन.

यावेळी बोलताना जयेंद्र चव्हाण म्हणाले की, मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक करतो व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देतो. मी शिक्षण विभागाला अशी विनंती करतो की प्रत्येक शाळेत शाळा सुरू होताना प्रार्थनेच्या वेळी एक ओंकार व दहा सूर्यनमस्कार कंपल्सरी करा, आपणाला आजारी विद्यार्थी मिळणार नाही .
या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी संतोष पवार ,दुसरा क्रमांक प्रिया माधव चव्हाण, तिसरा क्रमांक वैष्णवी सचिन बर्गे, व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे श्रद्धा गजानन गुजर व श्रुती संतोष जाधव यांना देण्यात आली.

मुलांमध्ये प्रथम क्रमांक सुजल मारुती चव्हाण, दुसरा क्रमांक स्वप्निल पंकज घनवट, तिसरा क्रमांक युवराज पंकज कुमार दास व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे सोहम काकासाहेब जाधव व साई भिमराव जाधव यांना देण्यात आली.

इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांक साजिरी लक्ष्मीकांत भोई, द्वितीय क्रमांक साक्षी दिनेश उधाणि, तृतीय क्रमांक राजनंदिनी अजय इंगळे, व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे ट्विंकल प्रकाश कुंभार, अश्विनी नंदकुमार पवार यांना देण्यात आली.

मुलांमध्ये प्रथम क्रमांक शुभम मुरलीधर नावडकर, ,द्वितीय क्रमांक देव प्रवीण राठी, ,तृतीय क्रमांकबरकत एहसान पाशा, व दोन उत्तेजनार्थ बक्षिसेअजिंक्य संतोष पवार,पार्थ आनंद हुदली, यांना प्रमुख पाहुण्या श्रीमती जयश्री पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. .
या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी दीपक वसंतराव पाटील, राजपुरोहित स्वीट्स, इक्रा उर्दू स्कूल, वीरभद्र ट्रेडर्स, पूना गाडगीळ सराफ, धन केशरचे रवींद्र जोशी, बाबा शेठ तांबोळी, विकास वाघ यांनी प्रायोजकत्व दिले होते.

या स्पर्धेत दोन्ही गटात घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार यांसाठी प्रथम सांघिक प्रकारात 51 सूर्यनमस्कार घेण्यात आले. त्यानंतर निवडक स्पर्धकांना तीन सूर्यनमस्कार व त्यानंतर एक सूर्यनमस्कार घालण्यास सांगण्यात आले .या स्पर्धेत क्षमता, आदर्श स्थिती व स्थिरता यावर पंचांनी विशेष भर देत बक्षीस पात्र स्पर्धकांची निवड केली.

स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक रुपये 1000 व स्मृतीचिन्ह, व्दितीय क्रमांक 700 रु व स्मृती चिन्ह, तृतीय क्रमांक रुपये 500 रोख व स्मृती चिन्ह दिले . तसेच दोन्ही वयोगटातील प्रत्येकी दोन स्पर्धकांना उत्सेजनार्थ बक्षिसे दिले .या शिवाय प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली .
कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी सौ.शैलजा ठोके ,सौ.शबाना शेख ,सौ.सुजाता पाटील , सौ. निलिमा खांडके ,डॉ. सौ. विजया कदम ,डॉ. प्रदिप घाडगे, सौ. शकुंतला जाधव,श्रीमती भोसेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी स्पर्धाकमिटीच्या सौ. सुजाता पाटील व सौ. अनुराधा इंगळे यांचे परिश्रम घेतले .