Your Own Digital Platform

स्वयंसिद्धा महोत्सवास फलटणकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
स्थैर्य, फलटण : फलटण येथील स्वयंसिद्धा परिवार म्हणजे वेगळेपण जपणारा परिवार .सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम घेऊन या परिवाराने लक्ष वेधून घेतले आहे ,नुकत्याच संपन्न झालेल्या स्वयंसिद्धा महोत्सवास फलटणकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष एडवोकेट सौ मधुबाला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला होता.

बचत गट व गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन विक्री खाद्यजत्रा मनोरंजन यांचा सुरेख संगम या महोत्सवात साधला गेला. या ठिकाणी ऑटोमोबाईल्स ,इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, खेळणी ,कपडे ,फॅशन ज्वेलरी, शोभेच्या वस्तू आदींचे स्टॉल या महोत्सवात सहभागी झाले होते.

या महोत्सवात विविध कार्यक्रमाने रंगत आणली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली .महिलांसाठी आयोजित पैठणी शोला महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. श्री .राहुल भालेराव व सौ .सोनाली भालेराव यांनी निवेदन करीत या कार्यक्रमात रंगत आणली. सौ रुपाली जाधव यांनी या पैठणी शोमध्ये प्रथम क्रमांक मिळविला व पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक पूजा चौगुले तर तृतीय क्रमांक अर्चना पवार यांनी मिळविला. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व स्वयंसिद्धा च्या अध्यक्षा एडवोकेट मधुबाला भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या महोत्सवास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन स्वयंसिद्धा च्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका दीपाली निंबाळकर ,नगरसेविका प्रगती कापसे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ ,अरविंद मेहता आदी मान्यवर उपस्थित होते .यांचे स्वागत सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. महाराजा मल्टीस्टेट चे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी आभार मानले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अकलुज येतील देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या गीतांना फलटणकर यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

चार दिवस चाललेल्या या महोत्सवात सद्गुरु व महाराजा उद्योगसमूहाचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.