Your Own Digital Platform

देगांव सोसायटी निवडणूकीत रयत कडून शेतकरी पॅनेलचा धुव्वा

देगांव सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी सौ. कांचन साळुंखे व इतर.

बाबाराजे गटाकडून विरोधकांचा १३-० ने पराभव; आ. शिवेंद्रराजेंकडून सत्कार

स्थैर्य, सातारा : संपुर्ण सातारा आणि कोरेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि राजकीयदृष्ट्‌या प्रतिष्ठेच्या बनलेल्या देगांव ता. सातारा येथील पाटेश्‍वर विकाससेवा सोसायटीच्या निडवणूकीत रयत पॅनेलने विरोधी शेतकरी पॅनेलचा १३ -० असा धुव्वा उडवून सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. सोसायटी निडवणूकीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या रयत पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिध्द केल्याने समर्थकांनी जोरदार जल्लोष   केला.

निवडणूकीत रयत पॅनेलचे उमेदवार नितीन माने हे बिनविरोध झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत रयत पॅनेलचे सौ. कांचन साळुंखे, संभाजी ताटे, ज्ञानदेव माने, रमेश सावंत, गोपिनाथ लोहार, याकुब शेख, जालिंदर साळुंखे, प्रदिप साळुंखे, जालिंंदर चव्हाण, झुंजीरराव महामुलकर, राजेंद्र साळुंखे, संगिता साळुंखे हे सर्व उमेदवार सुमारे १०० मतांच्या ङ्गरकाने निवडूण आले. शेतकरी पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. विजयी उमेदवारांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावा आणि सभासदांनी टाकलेला विश्‍वास सार्थ करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना केले.

यावेळी गोरख साळुंखे, सदाशिव सावंत, शंकर काळभोर, दिलीप घोरपडे, जगन्नाथ साळुंखे, सचिन साळुंखे, विजय घाडगे, नंदकुमार चव्हाण, नितीन साळुंखे, संपत पाटील, विलास साळुंखे, बाळकृष्ण साळुंखे, बंडू पाटील, महोदव शिंदे, तानाजी साळुंखे, प्रदीप घाडगे, तानाजी खुडे, संभाजी साळुंखे, विलास पवार, सतीश पाटील, किरण साळुंखे, राजेश साळुंखे, दाजीराव ताटे, मनोज लोणकर, विलास सावंत, सदाशिव माने आदी उपस्थित होते.