Your Own Digital Platform

जिल्हाधिकारी चषकास प्रारंभ


स्थैर्य, सातारा : राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ जिल्हा सातारा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी चषकाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा कृषी अधीक्षक महेश झेंडे, जिल्हा निबंधक प्रकाश आष्टेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, महासंघाच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते.या स्पर्धेत32 संघानी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. यावेळी बोलताना विद्युत वरखेडकर म्हणाल्या, संघटनेच्यावतीने भरवत असलेला स्पर्धेचा उपक्रम चांगला आहे. सर्व संघांनी व खेळाडूंनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडाव्यात. स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सर्व संघांना प्रशासनाच्यावतीने शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले. प्रकाश घाडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद चतुर यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत जाधव, संतोष कळसकर, एस.एस.पांचाळ, लक्ष्मण भोसले, विनोद नलवडे, अनिल महामुलकर, शशिकांत चांदणे, अशोक गोळे, विष्णू नलावडे, गुलाब येळे, प्रमोद उगले यांनी परीश्रम घेतले.