Your Own Digital Platform

उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


दि. 12 फेब्रुवारी ते शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2020 पर्यंत सोहळा - महारुद्र,नृत्य,संगीत,चित्रकला या सोबत प्रथमच संपूर्ण रात्र जागरण


स्थैर्य, सातारा : कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू.शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्य प.पू.शंकरविजयेंद्र सरस्वती यांच्या शुभाशिवार्दाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 
याही वर्षी बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2020 पासून शुक्रवार दि, 21 फेब्रुवारी 2020 पर्यंत हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी या महोत्सवात स्थानिक कलाकारांना विविध कला सादरीकरणासाठी प्राधान्य मिळावे म्हणून विशेष आयोजन करण्यात आले असून दररोज सादर होणार्‍या नृत्य समारंभाचे प्रसंंगी या कलाकारांना आपली फाईन आर्ट चित्रकला सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीही या महोत्सवात स्थानिक कलाकारंाची चित्रे व शिल्पे सादर होउन यावर्षी यात सहभाग घेउ इच्छिणार्‍यांना महाशिवरात्रीला विशेष स्मृतिचिन्ह देउन गौेरवण्यात येणार आहे अशी माहिती संयोजिका सौ.उषा शानभाग यांनी दिली. तसेच अधिक माहिती साठी मोबाईल क्र. 9423861849 किंवा 9404903000 व 9422038159 वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. मंदिरात महाशिवरात्री निमित्त महारुद्र ही घेण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रमात बुधवार दि. 19 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी दरम्यान महारुद्र व महाशिवरात्रीचे विविध धार्मीक कायर्ंक्रम संपन्न होणार आहेत. नृत्य, चित्र व संगीत महोत्सवात बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबई येथील गुरू सौ. भावना ठाकर व त्यांच्या शिष्यांचे कडून भरतनाट्यम सादर करणार आहेत. गुरुवार दि.13 फेब्रूवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील गुरु अनुया जोशी व सह कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. शुक्रवार दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता नाशीक येथील गुरु मिनल शहा यांचे शिष्यकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.
 
शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील गुरु मैत्रेयी बापट यांच्या शिष्या ऋचा उमेश आगाशे व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायं. साडे सहा वाजता पुणे येथील गुरु माधुरी आपटे यांचे बहारदार कथ्थक नृत्य सादर होणार आहे.

सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायं. साडे सहा वाजता गुरु वैशाली राजे घाडगे यांचे कलाकरांचा नृत्य कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ब्ल्यू नोट गिटार क्लासेसच्यावतीने गिटार, व्हायोलीन व तबला यांची जुगलबंदी सादर होणार आहे. त्यानंतर सायं. सात वाजता मुंबई येथील गुरु स्मीता नायर व सह कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुणे येथील गुरु सिमा जोशी व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायं. साडे सहा वाजता गुरु अमृता देवरुखकर व सह कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.
शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमीत्त सकाळी 9 ते 12 यावेळेत स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या शिष्यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ यावेळेत सातारा येथील नटराज नृत्यकला विद्यालयाच्या गुरु सौ.आंचल घेारपडे व सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजेपयर्ंंत मंदीर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.

रात्रभर विविध कार्यक्रम 

महाशिवरात्री निमीत्त या वर्षी प्रथमच नटराज मंदिरात महाशिवरात्री जागरण कार्यक्रम सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या मध्ये महाशिवरात्रीला रात्री नऊ वाजता कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन होवून त्यानंतर स्वरसाधना संगीत विद्यालयाचे गुरु सुधांशु किरकिरे यांची गणेश वंदना सादर होणार आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता सौ. प्राजक्ता चव्हाण या शिवमहिमा कथन करणार आहे. रात्री साडे दहा ते साडे अकरा या वेळेत वासोळा ग्रामस्थ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होवून रात्री साडे अकरा वाजता विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. रात्री साडेबारा वाजता प्रतिक सदामते व सचिन राजोपाध्ये यांचे गिटार व तबला वादन होणार आहे. रात्री दीड वाजता सौ. उषा शानभाग जप व ध्यान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मध्यरात्री अडीच वाजता इस्कॉन संस्थेंचे भजन होवून पहाटे साडे तीन वाजता सदगुरु शिवयोग कार्यक्रम असून पहाटे साडे चार वाजता ओंकार, आसने, प्राणायाम होवून पहाटे साडे पाच ते सहा या वेळेत महाआरती व शिवदर्शन सोहळा संपन्न होवून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या नटराज महाशिवरात्री महेात्सवासाठी सातारा जिल्हा वासियांनी तन, मन,धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन मंदीराचे वतीने करण्यात आले आहे.