Your Own Digital Platform

पदवी डिगी इंजिनिअरिंगची_........... थवे मात्र बेरोजगाराचे


स्थैर्य, सातारा : इंजिनिअरिंगची डिगी प्राप्त विद्यार्थ्याना बाजारपेठेत अपैक्षीत नोकरी प्राप्त होत नसल्याने
अनेक इंजिनिअर पदवी घेवूनही हाताश होवून मिळेळ ते काम करीत आहेत अनेकजण शिपाई पासून ते वेटरचे काम करीत आहेत हे विदारक स्थिती पाहता उच्च पदवीचे करायाचे काय असा सूर आता ड्ंगी प्राप्त विद्यार्थ्यामधून उमटत आहे हे चित्र असेच राहिळे तर नव्याने या क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्याचे भवितव्य काय याविषयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विशेष लेख.....

महासत्तेच्या दिशेने वाटचाळ करणाऱ्या भारतापुढे इंजिनिअरिंग पदवीधारकाचे बेरोजगारी समस्या भेडसवत आहे देशातील शिक्षण क्षेत्रात विशेषता उच्च शिक्षणामधीलळ इंजिनिअरिंग क्षेत्राची सध्या बिकट अवस्था झाली आहे देशातील लोखो विद्यार्थी आपले करिअर उज्वल घडावे म्हणून इंजिनिअरिग कडे धाव घेत आहेत देशातील असंख्य तंत्रशिक्षण महाविद्यालयातून विद्यार्थ्याना इंजिनिअरिग शाखेचे ज्ञान दिळे जात आहे परंतू मागील काही वर्षात इंजिनिअरिग शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना बाजार पेठेतील शिक्षणाचे ज्ञान नसल्याने त्याना नोकरी पासून वंचित रहावे लागत आहे हि संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे त्याचा देशाच्या सामजिक परिस्थितीवर परिणाम होत आहे इंजिनिअरिंगची डििगी आहे पण नोकरी नाही हे विदारक चित्र सध्या देशात दिसू लागले आहे याचा परिणाम देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढू लागले आहे इंजिनिअरिंगचे पदवी घेवून ही नोकरी मिळत नसल्याने त्याचा परिणाम आता शिक्षण संस्थामध्ये जाणवत आहे इंजिनिअरिंगचे प्रवेश निम्माहून कमी झाले आहेत.

देशाच्या प्रगती व विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला हा घटक आज बेरोजगाररच्या जाळयात फसला आहे हे देशाच्या दुष्टीने घातक आहे अर्थात बेरोजगाराचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत देशातील उघोग व्यवसाय मधील मंदी तसेच डिंगी आहे पण कौशल्याचा अभाव त्याचाप्राणे अधिक महाविद्यालयाना दिलेला परवानागी व त्याप्रमाण बरोबरच महाविद्यालयातून विद्यार्थ्याना प्रॅकटीकळचा अभाव या सर्वाचा परिणाम सध्या जाणवत आहे.

 उच्च तंत्रशिक्षण शास्त्र शाखेतील शिखर संस्था म्हणून ए आय सी टी ई नवी दिल्ली कार्यरत आहे या संस्थेने मागील १० वर्षात देशात मागेल त्याना इंजिनिअरिंग कॉलेज खिरापती प्रमाणेवाटल्याने तंत्रशिक्षण क्षेत्राचा दर्जाच लुप्त झाला आहे भूछत्राप्रमाणे उगविलेले तंत्रनिकेतनामध्ये सुविधा अभाव व दर्जाहिन शिक्षणामुळे विद्यार्थ्याचे अतोनात नुकसान झाले आहे बाजार पेठेला व उघोग व्यवसायाला या तंत्रनिकेतनमधून बाहेर पडलेला विद्यार्थ्या हा कुचकामी ठरल्याने आज इंजिनिअरिंगची पदवी आहे पण कैशल्य अभावी बेरोजगार म्हणून त्याला भंटकती करावी लागत आहे. देशाअतर्गत स्तरावर तंत्रज्ञान देणाऱ्या अंसख्य संस्था आहेत या संस्थामधून दरवर्षी हजारो इंजिनिअर निर्माण होतात पण निर्माण होणाऱ्या इंजिनिअरमधीळ केवळ १९८टक्के मनुष्यबळ उघोग विश्व व रोजगारक्षम पूरक ठरते हे केंद्रीय पाहणी पथकाचा अहवाळ थक्क करणारा आहे हे चित्र बदलन्याची क्षमता कौशल्य विकासातच आहे हे ही तितकेच सत्य आहे