Your Own Digital Platform

पालिकेकडून राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी पाच लाखाचा निधीविशेष सर्वसाधारण सभेत निर्णय; ठरावाला विरोधकांचा विरोध; मतदानाद्वारे ठराव बहुमताने मंजूर


स्थैर्य, फलटण : राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेला 5 लाख रुपयांचा निधी देण्याच्या ठरावाला विरोधी पक्षाने विरोध केला व दिलेली उपसुचना मतावर टाकून नगराध्यक्षानी ठराव बहुमतांनी मंजूर केला.

फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा दोन विषयांसाठी नगरपरिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा निता नेवसे होत्या.

यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे , मुख्याधिकारी प्रसाद काटकर,  जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अजय माळवे यांनी आज हुतात्मा दिन असून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी विनंती सभागृहला करताच दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. पहिला विषय नगरपरिषदेच्या शेजारीच असणार्‍या राजधानी टॉवरच्या उर्वरित कामासाठी तसेच सि.स .नंबर 3321 मधील दुकान गाळ्याचे दुरुस्ती साठी येणार्‍या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देण्याचा होता. चर्चा होऊन या विषयाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. दुसरा विषय क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने  65 वी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा सन 2019-2020,  दिनांक 02 फेब्रुवारी ते 5 दरम्यान येथील श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा नगरी, घडसोली मैदानावर आयोजित करण्यात आलेली असून, सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोशिएशन ने 5 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.त्यास मंजूरी चा होता. विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव यांनी यास विरोध करुन आयोजन समितीमध्ये नगरपरिषदेचा उल्लेख नसून निधी देण्यास विरोध करणारी उपसुचना मांङली .नगराध्यक्षा निता नेवसे यांनी बहुमतांनी फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले.