Your Own Digital Platform

अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेसमोर उग्र निदर्शने


स्थैर्य, सातारा : सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेवीकांची थकीत मानधन रक्कम सेवीकांच्या खात्यावर त्वरीत जमा करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या शेकडो महिला सदस्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेपुढे उग्र निदर्शने केली. आपल्या मागण्यांमध्ये तीन महिने थकीत मानधन त्वरीत द्या, बी. एल. ओ कामाची सक्ती नको. मानधन वाढीच्या थकीत रकमा त्वरीत जमा करा. मोबाईल रिचार्ज, इंधन बील, टीएडीए, भाडे रक्कम त्वरीत अदा करा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष आनंदी आवघडे, प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, निलोफर मुल्ला यांच्यासह सेवीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने (सीटू) च्या वतीने हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर करण्यात आल्याची माहिती या वेळी उपस्थीत अंगणवाडी सेवीकांना देण्यात आली. हातात लाल बावटा घेवून शेकडो अंगणवाडी सेविका भर उन्हात निदर्शने करीत होत्या. त्यानंतर संघटनेच्या वतीने म्ाुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात आले.