Your Own Digital Platform

चिले महाराज यांच्या पायी पालखी रथ सोहळ्याची सांगता


पायी हळू हळू चला मुखाने दत्त चिले बोला, आम्ही भाग्यवंत आनंद निधान, निघालो घेऊन चिले दत्ताची पालखी, असा दत्तनामाचा जयघोष करत टाळ मृदंगच्या गजरात भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या हजारो भाविकांच्या भक्ती सागरात चिले महाराज यांच्या रथ सोहळ्याची सांगता प्रजासत्ताक दिनी श्री क्षेत्र मोर्वे येथे नुकतीच झाली प पु सद्गुरू हिंगमिरे देवाच्या आशीर्वादाने व प्रेरणेने दरवर्षी चिले महाराजांचा आगमन दिन विविध धार्मिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो सद्गुरू चिले महाराजांनी दिनांक 26 जानेवारी 1984 रोजी मोर्वे येथे प्रथम पाऊल ठेवले तेव्हा पासून तो दिवस भाग्यवान दिन म्हणून भक्तगण साजरा करतात त्यानिमित्त प्रत्येक वर्षी 15 जानेवारी ला श्री क्षेत्र जेऊर येथून पालखी रथ सोहळ्याचे प्रस्थान होते हा सोहळा उंट, घोडे, बँड सह आकर्षक सजवलेल्या रथा मध्ये श्रींचा देव्हारा, चिले महाराजांच्या पादुका ठेवण्यात येतात आरती नंतर मिरवणूक मोर्वे गावाच्या वेशीवर आगमन होते. या दरम्यान अहिरे ते मोर्वे या अंतरामध्ये, ग्रामस्थां तर्फे गुढ्या, तोरणे, रांगोळ्या घालून आकर्षक स्वागत कमानी द्वारे पालखी रथ सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते. पायघड्या व पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या सनईच्या निनादत पालखी रथ सोहळा श्री दत्त मंदिर संस्थान मोर्वे येथे आणण्यात आला. विविध धार्मिक उपक्रम आणि भजन संद्येच्या कार्यक्रमात अवघे भाविक तल्लीन होऊन गेले होते. राज्यभरातून विविध ठिकाणच्या हजारो भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला यंदा झालेल्या ढोल, लेझीम स्पर्धेत विविध भागांतील संघांनी सहभाग घेतला होता. महाप्रसादा नंतर कर्यक्रमाची सांगता झाली.