Your Own Digital Platform

महाबळेश्वर मध्ये मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचे सपत्नीक आगमन

मुख्य मंत्री ना. ना.उद्धव ठाकरे यांचे वेण्णा तलाव हेलिपेडवर स्वागत करताना ना. शंभूराजे देसाई ,शेजारी आमदार मकरंद आबा पाटील ,आमदार भास्करराव जाधव आदी

स्थैर्य, महाबळेश्वर : महाबळेश्वर मध्ये मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचे आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वेण्णा तलाव हेलिपेडवर सपत्नीक आगमन झाले . त्यांचे स्वागत गृहराज्य मंत्री ना. शंभूराजे देसाई ,ना.अजय चौधरी ,या भागाचे लोकप्रिय आमदार मकरंद आबा पाटील , गुहागरचे आमदार भास्करराव जाधव ,डीएम. बावळेकर ,महाबळेश्वर नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे ,उप नगराध्यक्ष अफझल भाई सुतार ,इसुबभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सातारा जिळाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते ,, प्रमुख जिल्हा वनाधिकारी श्री ह्ड्डा .,नगरसेवक ,नगरसेविका व विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ना. ठाकरे येथे येत असल्याने त्याच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी होती .हा त्यांचा खाजगी दौरा आहे .गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांच्या मुलीचे उद्या शनिवारी महाबळेश्वर येथील कीज रिसोर्ट येथे विवाह सोहळा आहे ,त्या सोहळ्यासाठी ना. ठाकरे सपत्नीक आल्याचे सामजते ते येथील गिरी चिंतन ह्या शासकीय विश्राम गृहात उतरले आहेत .कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान नेहमीच मुख्यमंत्री वा राज्यपाल हे येथील पोलो ग्राउंड येथील हेलिपेड वर उतरतात मात्र यावेळी परवानगी नं मिळाल्याने मुख्यमंत्र्याना वेण्णा तलावा वरील पहिल्यांदाच बनविण्यात आलेल्या खास हेलीपेड्वर उतरावे लागले.