Your Own Digital Platform

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार


स्थैर्य, सातारा : दुचाकीवरून घरी येत असताना डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सचिन चंद्रकांत गुजर (वय ३५, रा. भोंदवडे, ता. सातारा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजापुरी फाट्यावर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, सचिन गुजर हा वनविभागामध्ये काम करत होता. ठोसेघर, ता. सातारा येथे त्याची ड्यूटी होती. सायंकाळी ड्यूटी संपवून तो मित्रासमवेत दुचाकीवरून घरी येत होता. राजापुरी फाट्यावर आल्यानंतर समोरून आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन गुजर हा जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी जखमी मित्राला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झाली नव्हती.