Your Own Digital Platform

जिल्हा बँकेच्या वाढीव व्याजदराचा ग्राहक व ठेवीदारांनी लाभ घ्यावा - मा . आ .श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले,


स्थैर्य, सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे . नाबार्डकडून सलग सहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त करुन सभासद, शेतकरी, सर्व सामान्य असंख्य हितचिंतक या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या व आयएसओ ९००१-२००८ हे मानांकन प्राप्त केलेल्या तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून नोंद झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा या करीता दि .०१/०२/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत नेहमीच्या ठेव योजनां व्यतिरिक्त एकरकमी रू . १५ लाख व त्यावरील रकमेची १ वर्ष ३ महिने मुदतीची ७.५० टक्के व्याजदराची मुदत ठेव व धनवर्धिनी ठेव योजना सुरू केली आहे .
 
याशिवाय १८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ६.५० टक्के, १ वर्ष ते ३ वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ७.२५ टक्के, ३ वर्ष ते १० वर्षापर्यंत ७.५० टक्के दराने मुदत ठेवीवर व्याजदर लागू आहेत . तसेच दामदिडपट ठेवीचा कालावधी ६५ महिने १५ दिवस व दामदुप्पट ठेवीचा कालावधी ११२ महिने असून, अन्य मुदत ठेवीवरील व्याजदराप्रमाणेच या ठेवींनाही जेष्ठ नागरिकांकरीता १ टक्का जादा व्याजदराचा लाभ देणेत आलेला आहे . ग्राहकांना एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस., ए.टी.एम.,रूपे डेबिट कार्ड, एस.एम.एस. अलर्ट, डीबीटीएल, आय.एम.पी.एस., इंटरनेट बँकिंग इ .सुविधा उपलब्ध केल्या असून एनी ब्रँच बँकिंगच्या सुविधा विना कमिशन दिल्या जात आहेत .जिल्हयातील बँकेच्या ३०४ शाखा व १५ विस्तारीत कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करीत आहे . सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिव्हाळ्याची सेवा देण्यास सदैव तत्पर आहे . बँकेचे सर्व ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून रू . १ लाखापर्यंतचे सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे . बँकेने कर्ज वसूलीचे कामकाज सातत्याने प्रभावशाली केलेने गत १२ वर्षे बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखले आहे .
 
जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी बँकेने ठेवी व कर्जाच्या अनेकविध योजना आखल्या असून, त्यास जिल्हयातून चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे . तद्वतच, कृषी व कृषी औद्योगिक उत्पादनात भरघोस वाढ करण्यांसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे . तेंव्हा आजच बँकेच्या नजिकचे शाखेमध्ये विविध ठेव योजनेत गुंतवणूक करावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, मा. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष श्री .सुनिल माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे .