Your Own Digital Platform

सोनके-करंजखोप मार्गावर ट्रक्टर ट्रेलर-दुचाकीचा अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार


स्थैर्य, वाठार स्टेशन : सोनके-करंजखोप मार्गावरील सोनके गावाच्या हद्दीत ऊसाचा ट्रेलर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार संजय रामचंद्र भोईटे वय ३७ जागीच ठार झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राञी आठ वाजण्याच्या सुमारास सोनके-करंजखोप रस्त्यावरील सोनके गावाच्या हद्दीत वसना नदीवरील पुलाच्या जवळ करंजखोपहून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रक्टर क्रमांक MH-11 BA2826 व सोनकेकडून करंजखोपकडे जाणाऱ्या दुचाकी MH-50 J341 यांच्या अपघातात दुचाकीस्वार संजय रामचंद्र भोईटे वय ३७ रा. तडवळे संमत वाघोली यांच्या दुचाकीला मागिल ट्रेलरची धडक बसल्याने दुचाकी घसरून दुचाकीस्वार ट्रेलरच्या मागिल चाकाखाली सापडल्याने ते जागीच ठार झाले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.पोलिस प्राथमिक प्रक्रियेनंतर दुचाकीस्वराला शवविच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील ट्रक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे