Your Own Digital Platform

सातार्‍यात श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


स्थैर्य, सातारा : केंद्र सरकारने ठरविलेल्या नागरीकत्वाच्या मोहिमेमुळे देशातील आम जनतेला प्रचंड असुरक्षितता जाणवत आहे. जनतेत असणार्‍या अस्वस्थतेमुळे ही मोहिम पिढ्यान पिढ्या देशात राहून देश घडविण्याचे कार्य करणार्‍या जनतेच्या नागरीकत्वाची तपासणी करणे म्हणजे जनतेचा उपमर्द करण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रसरकाने ही नागरीकत्वाची मोहिम रद्द करावी तसेच आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात केलेल्या तुलनेमुळे छत्रपतींचा घोर अवमान झाला आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी तसेच भाजप पक्ष कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यामुळे पक्षानेही माफी मागावी असा आग्रह धरण्यासाठी जिल्ह्यातील श्रमीक मुक्तीदलाच्या वतीने आग्रह मोर्चा काढण्यात आला. सातारा येथील गांधी मैदानावरुन निघालेला हा मोर्चा राजपथ पोलीस मुख्यालयावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. 

या मोर्चात डॉ. भारत पाटणकर, डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिलीप पाटील, बाळासाहेब शिंदे, सुरेश पाटील, संतोष गोरल, सुभाष शिंदे, संजय जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.