Your Own Digital Platform

बोगद्यातील एकेरी वाहतुक ठरतेय डोकेदुखी


बोगद्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने वाहनधारकांना करावी लागतेयं कसरत

 
स्थैर्य, सातारा : शेंद्रे ते सातारा या बाह्यवळण रस्त्यावर राज्य मार्ग 140 मध्ये अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्याकरता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना तासंतास बोगद्यातून साताऱयात येण्यासाठी ताटकळत प्रवास करावा लागत आहे.
 
सातारा ते शेंद्रे या बाह्य वळण जाणाऱया रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या दुरुस्तीचे काम होई पर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यामुळे परळी भागातून शहरत दाखल होण्यासाठी वाहन धारकांना तासंतास वाट बघावी लागत आहे. सकाळच्या प्रहरात बोगदा ते समर्थ मंदीर अन् बोगदा ते जवळपास डबेवाडी येवढय़ा लांब दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहे. यामुळे यामार्गाहून प्रवास करताना वाहनधारकांची दमछाक होत आहे. 
 
मोठय़ा वाहनांमुळे होतेय वाहतुक कोंडी
सातारा शहराच्या पश्चिम भाग जोडण्याकरीत असलेल्या बोगदा दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने येथून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यातच मोठय़ा वाहनांची संख्या जास्त असल्याने सकाळच्या प्रहरात बोगदा परिसरात दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत.