Your Own Digital Platform

अश्वघोषने बुध्द तत्वज्ञान उजेडात आणले : आ. ह. साळुंखे व अरुण जावळे यांना पुरस्कार प्रदान


स्थैर्य, सातारा : अश्वघोषने बुध्दाला प्रमाण मानून बुध्द तत्वज्ञान नव्याने प्रकाशात आणले. ते समाजमनात कसे रुजेल याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय समाज आणि संस्कृतीवर अश्वघोषचा प्रभाव राहिला. मात्र त्याची चर्चा ठळकपणे फारसी झाली नाही. मानवी कल्याणाचा ध्यास उराशी बाळगून अश्वघोष लिहित राहीला. अवघं आयुष्यभर समतेचा, स्वातंत्र्याचा, मुक्तीचा उत्तुंग विचार तो पेरत राहीला. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही आनंददायी बाब आहे, अशा भावना प्राच्यविद्या पंडीत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केल्या.
 
धम्म महोत्सव समिती, सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या विद्यमाने आयोजित भव्य धम्म महोत्सव पार पडला. त्यामध्ये अश्वघोष पुरस्कार डॉ. आ. ह. साळुंखे यांना महाथेरो भदंत खेमधम्मो यांच्याहस्ते, तर अरुण जावळे यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते अस्मिताघोष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. आ. ह. साळुखे बोलत होते. यावेळी सामुदायिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, तुषार ठोंबरे, प्रशांत कुलकर्णी, महाथेरो खेमधम्मो आदी मान्यवर उपस्थितीत होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान डॉ. प्रताप गोळे यांनी भूषविले.

धम्ममहोत्सवाचे उदघाटनसत्रात महाथेरो भदंत खेमधम्मो, भंते दीपंकर,धम्मचारी यशोरत्न यांनी आपले विचार मांडले. कवी संमेलनाच्या सत्रात वसंत शिंदे, सुमित गुणवंत, सागर काकडे, जित्या जाली यांनी सहभाग होता. या संमेलनाचे संचालन देवा झिंजाड यांनी केले तर जेष्ठ विचारवंत नारायण जावळीकर यांनी अध्यक्षीय भूमिका स्पष्ट केली. तिस-या सत्रात उषा कांबळे यांचा 'मी सावित्रीबाई फुले बोलते' हा एकपात्री प्रयोग झाला. त्यानंतरच्या सत्रात 'बुध्दयान ते संविधान' या विषयावर प्रशांत कुलकर्णी, तुषार ठोंबरे यांनी सविस्तर विवेचन केले. 

पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या भाषणानंतर पत्रकार अरुण जावळे यांनी भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रताप गोळे यांनी माणासाने माणुसकीचा विचार कसा जापावा याबद्दल उदबोधन केले. प्रास्ताविकपर भाषणात मिलिंद कांबळे यांनी धम्ममहोत्सव आणि पुरास्कारासंबधी विवेचन मांडले. दिवसभराच्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल देवकांत, प्रतिक्षा कांबळे, विजय भंडारे, योगेश म्हस्के यांनी केले, तर आभार प्रसाद गुडिले, किरण कांबळे यांनी मांडले. धम्मसोहळा यशस्वी करण्यासाठी ॲड. नितिन कांबळे, सीमा कांबळे, कोमल म्हस्के, सुशीलकुमार कांबळे, शिवाजी गंगावणे, मुकेश गंगावणे, संकेत म्हस्के आदींनी विशेष परिश्रम घेतले. धम्ममहोत्सवास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सातारा व पंचक्रोशील धम्म बांधव उपस्थित होते. परिवर्तनाच्या चळवळीत सातत्यपूर्ण कार्यरत असणा-या जिल्ह्यातील २२ कार्यकर्त्यांचा यादरम्यान सामुदायिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.