Your Own Digital Platform

सन्मती सेवा दलाच्या स्वयंसेवकांकडून प्रजासत्ताकदिनी श्रीसम्मेद शिखरजी येथे स्वच्छता अभियान संपन्न

स्थैर्य, फलटण : झारखंड येथील श्रीसम्मेद शिखरजी पहाडावर स्वच्छता अभियान राबवताना सन्मती सेवा दलाचे कार्यकर्ते.


स्थैर्य, फलटण : सोलपुर, पुणे,उस्मानाबाद, सातारा,अहमदनगर जिल्ह्यातील श्री सन्मती सेवा दलाच्या 150 स्वयं सेवकांनी झारखंड येथील जैन धर्मियांचे काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थ क्षेत्र श्रीसम्मेद शिखरजी पहाड़ा वर 26जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवित,शेकडो किलो कचरा जळून नष्ट करत जमीनी पासून 4हजार 200 फुटऊंच असलेल्या पारसनाथ ,गौतम गणधर (टोक) पहाड़ावर तिरंगा ध्वज फड़काविला तसेच सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. या स्वयं सेवका सोबत तेथील 20ते25 स्थानिक लोक ही सहभागी झाले होते या सर्वांनी प्लास्टिक बिस्किट पूड़ेचे कागद,पाणी बाटली, नारळ केसर, आदि शेकडो किलो कचर्‍याची विल्हेवाट लावली.
 
सोलापूर पुणे नगर सातारा,उस्मानाबाद या जिल्ह्यासह महाराष्ष्ट्रातील जैन धर्मियांचे व युवक युवतींचे प्रतिनिधित्व करणारी संघटना श्री सन्मती सेवा दल मार्फत गेल्या 8 वर्षांपासून श्री तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान राबविले जात आहे,पहिल्या वर्षी फक्त 15 सदस्यांवर हे स्वच्छता अभियान सुरु झाले होते, वर्षोंवर्षी यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.यावर्षीचे हे 9 वे वर्ष आहे.

जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखले जाणारे झारखण्ड राज्यातील हे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी असून श्री सम्मेद शिखरजीची एकदा तरी वंदना करण्याचे प्रत्येक जैन बांधवाचे स्वप्न असते पण ते खर्चिक असल्याने काहिंचे ते स्वप्न पूर्ण होत नाही ,ही गोष्ट लक्षात घेवून व स्वच्छतेचे महत्व जाणून श्री सन्मती सेवा दलाने स्वच्छतेतुन ईश्वरभक्तिकडेहे धोरण अवलम्बवुन स्वच्छता अभियान सुरु केले. या माध्यमातून ग्रामीण भागातील जैन धर्मियासाठी शिखरजीची वंदना करण्याचे स्वप्न सन्मती दलाने सत्यात उतरवले.आज पर्यन्त स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने हजारो जैन बांधवांची अल्प दरात श्री सम्मेद शिखरजी यात्रा झाली आहे,यापुढील काळातही हे कार्य अखण्डित चालु राहणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले.

हे स्वच्छता अभियान यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष ,उपाध्यक्ष सर्व भागातील सन्मती दलाचे सदस्य सभासद आदींनी परीश्रम घेतले.या स्वच्छता अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभियान यात्रा काळात हे स्वयंसेवक जेथे जेथे थांबतात,तेथीलही स्वच्छता करतात ,तसेच जाण्या येण्याच्या प्रवासात आपन केलेला कचरा स्वतः उचलून फेकून देतात.

दलाने सम्मेद शिखरजीचा अवघड असा पहाड़ सुमारे सव्वा तीनशे जणांनी एकत्रित येवून स्वच्छ केला,या कार्याची दखल घेवून गोल्डन बुक मधेही याची नोंद झाली आहे.

अभियान यशस्वीतेसाठि संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी, विद्यमान अध्यक्ष मयुर गांधी, संदेश दोशी, प्रज्योत गांधी, जिनेंद्र दोशी, नवजीवन दोशी, संदेश गांधी, विरकुमार दोशी, प्रसिद्धी प्रमुख यशराज गांधी,केतन दोशी, नमन गांधी,योगराज गांधी, भरतेश दोशी आदिनी परिश्रम घेतले.