Your Own Digital Platform

योग्य नियोजन केल्यास दर्जेदार उत्पन्न मिळते : अंबादास खराडेद्राक्ष बागेची पाहणी करताना अंबादास खराडे, प्रशांत भोसले व मान्यवर . ( छाया : समीर तांबोळी )स्थैर्य, कातरखटाव : द्राक्षामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीकवर येणारा जैविक आणि अजैविक ताण नियंत्रित ठेवण्यासाठी वातावरणातील बदलानुसार योग्य नियोजन केल्यास दर्जेदार उत्पादन घेता येते असे प्रतिपादन युवा उद्योजक अंबादास खराडे यांनी केले.

मायणी (ता.खटाव ) येथे श्रीराम ऍग्रो च्या वतीने आयोजित द्राक्ष पीक पाहणी व चर्चासत्र प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रशांत भोसले ,एम.डी.गांजवे, प्रशांत नाळे , वैभव पिसाळ, आबाजी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

खराडे म्हणाले की आपल्या भागातील निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात चांगली मागणी असून जर्मनी व युरोप मधून या मालाला मागणी वाढू लागली आहे.

उत्पादकांनी बागेकडे बारकाईने लक्ष केंद्रित करून वातावरण बदलानुसार योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगले व दर्जेदार उत्पादन मिळन्यास मदत होणार असून चांगल्या प्रतीच्या मालाला उच्चतम दर मिळन्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार आहे. मायणी परिसरात थेट शेतकऱयांच्या बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन करत प्रशांत भोसले यांनी कमीत कमी खर्चात द्राक्ष बागा चांगल्या फुलवल्या असून बुरशीजन्य रोगावर चांगले नियंत्रण ठेवले आहे.त्यामुळे कमी खर्चात चांगले व दर्जेदार उत्पादन निघू शकेल असे सांगून खराडे यांनी शेतकऱ्यांसाठी वेलाग्रो बायोसायन्स कंपनी च्या माध्यमातून झिरो रेसिड्यु युक्त द्राक्षांसाठी बाजार पेठ उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी बागायतदार रघुनाथ बापू यलमर,राजेंद्र यलमर बबन माळी,गोरख माळी,महादेव माळी,प्रविण माळी,बापुराव यलमर,चंद्रकांत यलमर,सुनील देशमुख, धनाजी यमगर,दिग्विजय पाटील आदींसह द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश भराडे यांनी आभार मानले.