Your Own Digital Platform

अजिंक्यतारा विद्यालयाचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील

अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर.

स्थैर्य, सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांच्या शैक्षणिक दृष्टीकोणातून सर्वांना शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय १९९१ पासून कार्यरत आहे. या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध क‘ीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत आहेत. भविष्यात हे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील, असा विश्‍वास साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गला गुणांना आणि कौशल्यांना उभारी देण्यासाठी अजिंक्यतारा विद्यालयात चित्रकला, भूगोल प्रज्ञाशोध, हिंदी अभिव्यक्ती बोध परिक्षा, विज्ञान प्रदशन यासह विविध क‘ीडा प्रकारांचे प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. नुकत्याच झालेल्या शासकीय क‘ीडा स्पर्धांमध्ये कु, अनुजा जाधव (आर्चरी) हिने राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क‘मांक, ओम कदम (आर्चरी) याची राष्ट्रीय संघात निवड झाली होती. तसेच ७ विद्यार्थी जिल्हा स्तरावर, २ विद्यार्थी विभाग स्तरावर, २ विद्यार्थी राज्य तर दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले. या सर्व विद्यार्थ्यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे, संस्थेचे व कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई, विद्यालयाचे प्राचार्य संजय नलवडे, ज्युनियर विभाग प्रमुख महेश जाधव, क‘ीडा शिक्षक पी.डी. कणसे, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अजिंक्यतारा विद्यालयात उच्चतम दर्जाचे शिक्षण दिले जात असून त्याचा ङ्गायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात चमकदार करता यावी, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगभुत कलागुणांची आणि कौशल्यांची पारख करुन त्यांना त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी सहकार्य करावे. भविष्यात अजिंक्यतारा विद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयाचे आणि आपल्या सातार्‍याचे नाव उज्वल करतील, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला.