Your Own Digital Platform

मुधोजी महाविद्यालयात आज प्राणिशास्त्र विषयावर राष्ट्रीय परिषद


स्थैयर्र्, फलटण : आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2020 रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे प्राणिशास्त्र विभाग आणि बायोव्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्येमाने ’कंजर्वेशन ऑफ बायोलाजिकल डायव्हर्सिटी’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी देशातील विविध महाविद्यालयातील सुमारे दोनशे संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
 
या परिषदेचे उद्घाटन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक 10 वा. होणार आहे. परिषदेच्या प्रथम सत्रात प्रा.डॉ. डी. व्ही. मुळे, कुलसचिव- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे भूषविणार आहेत. या परिषदेसाठी डॉ. बबन इंगोले, प्रमुख शास्त्रज्ञ- आय.एन. एस. गोवा, डॉ. वरद गिरी- एन. सी. बी. एस. बंगळूर , डॉ. एम. व्ही. सांताकुमार- प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. जी. पी. भवाने- माजी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या मान्यवर साधनव्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या परिषदेस संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण गायकवाड यांनी केले आहे.