Your Own Digital Platform

ज्ञानक्षेत्रात गौरीशंकर देगाव फार्मसीची सर्वोत्तम कामगिरी - कुलगुरु डॉ व्ही आर सास्त्री

कुलगुरु डॉ व्ही आर सास्त्री याचे स्वागत करताना डॉ अनिरुध्द जगताप

स्थैर्य, सातारा : विद्यापीठ कार्यक्षेत्रात गुणवतेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा बहुमान गौरीशंकर
देगाव फार्मसीने अनेकदा प्राप्त केळा आहे त्यामुळे या महाविद्यालयाची ज्ञानक्षेत्रात आगळी वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे मत डॉ.बाबासाहेब आंबडेकर टेक्नालॉजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ व्ही आर सास्त्री यांनी गौरीशंकर देगाव महाविद्यालयाच्या सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्‍त केले.

यावेळी संस्थेचे संचाळक डॉ अनिरुध्द जगताप प्राचार्य डॉ नागेश अलोरकर उपप्राचार्य डॉ.अजित कुलकर्णी डिप्लोमा फार्मसीच्या प्राचार्या नयना पिपोंडकर रजिस्ट्रर काळे याचे प्रमुख उपस्थिती होती. सते पुढे म्हणाळे औषधनिर्माण सास्त्री शाखेतील विद्यार्थी सक्षम घडावा यासाठी महाविद्यालय कठोर परिश्रम घेत आहे अध्यावत सोयीसुविधामुळे येथील विद्यार्थ्याना नविण्यपूर्ण शिक्षण सहज प्राप्त होत आहे हे पाहून मी प्रभवित
झालो आहे.

प्रारंभी कुलगुरु डॉ व्ही आर सास्त्री यांचे स्वागत डॉ अनिरुध्द जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्ही आर शात्र यांनी संपूर्ण महाविद्यालयाची पाहणी करुन समाधान व्यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ नागेश अलोरकर व आभार डॉ. अजित कुलकर्णी यांनी केले.