Your Own Digital Platform

परिवहन महामंडळाच्या उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन


स्थैर्य, सातारा : परिवहन महामंडळाच्या भरती प्रक्रियेत 514 जागा रिक्त असताना 449 उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र झाले होते. परंतू 289 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच 42 उमेदवारांची अतिरिक्त परिक्षा यादीमध्ये निवड झाली. मेरिटमध्ये आलेल्या 118 उमेदवारांची नावे निवड यादीमध्ये आलीच नाहीत. अशा उमेदवारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा प्रशासनाला संबधित उमेदवारांनी सादर केलेल्या निवेदनात म्हणले आहे की भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा 24 फेब्रुवारी2019 रोजी झाली .6 मे2019 रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली .5 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोजी भोसरी येथे संगणकीकृत वाहनं चाचणी घेण्यात आली .549 रिकत जागांसाठी 449 जण पात्र ठरले . मात्र 289 उमेदवारांची अंतिम यादी व 42 जणांची अतिरिक्त प्रतिक्षा यादी बनवण्यात आली . मात्र यामध्ये 118 उमेदवारांचा अजिबात समावेश झाला नाही . मराठा प्रवर्गाचा विशेष मागास प्रवर्ग असताना तशी तत्सम कागदपत्र शासकीय कार्यालयातून उपलब्ध झाली नाही . त्यामुळे मराठा प्रवर्गातील उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत . इतर प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गात हस्तांतरित झाल्याने मराठा प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्यायं झाला आहे . सदर भरती प्रक्रियेचा निकाल 28 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर झाला .118 उमेदवारांनी सर्व लोकप्रतिनिधींना निवेदने पाठविली . याची राज्य शासनाकडे सुध्दा तक्रार करण्यात आली आहे .आमच्या निवेदनावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याची तक्रार आंदोलक उमेदवारांनी केली आहे.

संतप्त परिक्षार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात निदर्शन करित आहेत. असा इशारा आंदोलक उमेदवारांनी दिला आहे .