iDainik.com

Your Own Digital Platform

आमच्याविषयी :

... कै. दिलीप मधुकर रुद्रभटे ...

 हीच ओळख आणि आमचे प्रेरणास्थान


तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळे सतत वेगळे काहीतरी करीत आहोत, सतत धडपडत आहोत. हे सुरु असताना तुमची शाबासकीची थाप हवी होती. मात्र, आज तुम्हालाच अभिवादन करावे लागत आहे, हे नियतीचे प्रारब्धच मानावे लागेल.


दैनिक स्थैर्यचे 

इंटरनेट दैनिक

www.idainik.com


फलटण तालुक्यातून निर्भीडपणे गत 18 वर्षापासून प्रसिद्ध होणारे दैनिक म्हणून स्थैर्यचा नावलौकीक आहे. सातारा जिल्ह्यातील घडामोडी काही क्षणांत नेटीझन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही www.idainik.com हा इंटरनेट दैनिकाचा उपक्रम सुरु केला आहे.

फक्त घडामोडीच नव्हे तर त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील लेखकांना आपल्या हक्काचे डिजीटल व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. आगामी काळात व्हिडीओ वेब चॅनेलही सुरु करण्याचा टप्पा आम्ही गाठणार आहोत. व परिपूर्ण इंटरनेट दैनिक साकारणार आहोत. ‘‘काळाच्या बरोबर रहाल, तरच टिकाल.’’, असे म्हणत आधुनिकतेची कास धरण्याची शिकवण दैनिक स्थैर्यचे संस्थापक कै. दिलीप रुद्रभटे यांनी आम्हाला दिली. आज याच शिकवणीमुळे सातारा जिल्ह्यावासीयांच्या हक्काचे डिजीटल व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकलो. कै. दिलीप रुद्रभटेंच्या तत्वांशी बांधील राहून ज्याप्रमाणे स्थैर्य सुरु आहे, त्याचप्रमाणे इंटरनेट दैनिकही सुरु राहील.  

          - चैतन्य दिलीप रुद्रभटे, दैनिक स्थैर्य, फलटण
आमच्याविषयी आपल्याला काय वाटते नक्की कळवा...